*नातेपुते---- प्रतिनिधी*
*श्रीकांत - बाविस्कर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
पिरळे तालुका माळशिरस येथे
आबारत्न शिक्षण संस्था व समस्त ग्रामस्थ पिरळे यांच्या वतीने माढा लोकसभेचे खा धैर्यशील मोहिते पाटील नूतन आमदार उत्तमराव जानकर व दलित पॅन्थर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले यांचा भव्य दिव्य सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना
खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की ,आपण सर्वजण मिळून काम करूया जेवढं सहकार्य लागेल तेवढे सहकार्य आम्ही करू पिरळे गावातील नेतेमंडळी नेहमीच गावच्या विकासासाठी झटत असतात, निधी आणण्याचा प्रयत्न करतात.तुमचे कुठल्याही प्रकारचं काम थांबणार नाही.लाईटचा प्रश्न लवकरच मार्गी लावू , सर्व गावकऱ्यांनी भव्य दिव्य कार्यक्रम घेतला आपले मनापासून धन्यवाद.
यावेळी बोलताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, पिरळे गावात आज" खासदार आपला ,आमदार आपला" ,हा आनंदाचा क्षण याची देही याची डोळा पहावयास मिळाला या गावाला. त्याच तोला मोलाचा कार्यक्रम पिरळे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे, ग्रामस्थांचे मनापासून आभार. या वेळच्या निवडणुका खूप वेगळ्या होत्या मोहिते-पाटील आणि आपण एकत्र झालो आपल्याला यश मिळाले. .पण ईव्हीएम मधून येणारे आकडेवारी ही चकित करणारी होती.यावर कोणीतरी विरोध करायला पाहिजे म्हणून आपण संघर्षाच्या माध्यमातून विरोध करत आहोत . जंतर-मतरवर मी आंदोलन व सत्याग्रह करणार आहे माझा राजीनामा मी निवडणूक आयोगाला देणार आहे. तुमच्या हक्कासाठी काल ही संघर्ष करत होतो आणि आज उद्या संघर्ष करणार आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करू, पिरळे हे गाव हृदयापासून खासदार साहेब आणि आमचाच आहे.
तसेच दलित पॅंथर चे घनश्याम भोसले
हे म्हणाले की आम्ही लोकसभेला व विधानसभेला दलित पॅंथरणे या ठिकाणी पाठिंबा दिला होता व सर्व संघटनेच्या सदस्यांनी ही आपले काम केले होते असे सांगितले, माजी सरपंच संदीप नरोळे यांनी पिरळे या गावात ग्रामपंचायतला इमारत नसल्याने कार्यक्रम किंवा इतर गोष्टी त्रास होतो तरी नवीन इमारत व्हावी व आरोग्यासाठी शासकीय दवाखाना मिळावा तसेच गावातील अंतर्गत रस्ते हे खराब झाल्याने त्यासाठी ग्रामपंचायतला निधी मिळावा अशी मागणी त्यांनी या वेळेस खासदार व आमदार यांना केली गावातील असणाऱ्या समस्यांची मागणी केली, मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक(नाना) शिंदे यांनी केले. धैर्यशील मोहिते पाटील व आ उत्तमराव जानकर यांची ढोल ताशा हलगी गजी सह गाजत वाजत जे.सी.बी मधून पुष्पृष्टी करत भव्य दिव्य गावातून मिरवणूक काढण्यात आली 200 किलो वजनाचा गुलाब व झेंडूच्या फुलांचा हार घालून सत्कार करण्यात आला.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादां धाईंजे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समितीचे माजी सदस्य माऊली पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अजय सकट,पांडुरंग वाघमोडे,मधुकर पाटील,राजाभाऊ रुपनवर व अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आबारत्न शिक्षण संस्थेने केले यांनी केले होते.तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परळी गावाचे माजी सरपंच महादेव शिंदे , ग्रामपंचायत सदस्य संदीप नरोळे ,शिवाजीराव लवटे-पाटील,संदीप वाघ,गणेश दडस,दत्तात्रय लवटे पाटील,सर्व शिक्षक स्टाफ संस्थेतील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
टिप: खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर व दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले यांची उघड्या जीप मधून भव्य अशी मिरवणूक करण्यात आली होती व पिरळे गावामध्ये जेसीपी वरून फुलाचा वर्षाव करण्यात आला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा