*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
माळीनगर,ता माळशिरस येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा क्रमांक एक मधील शिक्षिका रंजना राजीव देवकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.तसेच राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत त्यांनी सर्वोत्कृष्ट काव्याचा विशेष पुरस्कार पटकावत प्रथम क्रमांक मिळवून साहित्य क्षेत्रातही आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे.
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी,मुंबई यांच्यावतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार तर मासिक न्यायप्रभाततर्फे सर्वोत्कृष्ट काव्याचा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सौ.देवकर यांची २९ वर्षाच्या सेवेत उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळख आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेस प्रोत्साहन देणे,समूहगीत गायन,स्पर्धा,अंवातर वाचन,परिसर भेट व सहली,नृत्य,वक्तृत्व स्पर्धा,कथाकथन,नाट्य,कविता,माझी शाळा सुंदर शाळा,माझी शाळा माझा अभिमान,क्रिडा व कौशल्ये,प्राणायम, योगा,कवायत,झाडे लावा झाडे जगवा,वाचन-लेखन आदी उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला.तसेच त्यांनी 'निसर्ग' या विषयावर चारोळी लेखन,साप्ताहिक व मासिकांतून कविता लेखनही केले आहे.त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष राजेंद्र गिरमे,सचिव अजय गिरमे,उपाध्यक्ष नितीन इनामके,संचालक मंडळ व विश्वस्त,मुख्याध्यापक बाळकृष्ण कोळी यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा