Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

*धाराशिव जिल्ह्यातील शासकीय महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी काम बंद आंदोलन-धाराशिव चे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार अखेर मागे.*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

धाराशिव (उस्मानाबाद )जिल्ह्यातील शासकीय महसूल कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी संजय ढवळे यांच्या विरोधात लेखणी काम बंद आंदोलन चालू केले होते त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अपंग व शेतकरी गोरगरीब दिन दुबळे वयोवृद्ध महिला इतर नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे तुळजापूर येथील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे ) शिवसैनिक अमोल शिवाजीराव जाधव यांनी हा लेखणी काम बंद आंदोलन मागे घेण्याबाबत राज्याचे -मुख्यमंत्री ,देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री --एकनाथ शिंदे ,अजित दादा पवार ,यांना मेलद्वारे लेखणी काम बंद आंदोलन माघार घेण्यासाठीचे निवेदन दिले होते त्या अनुषंगाने धाराशिव चे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी तातडीने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना लेखणी काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आणि सर्व कामकाज सुरळीत चालू झाले असल्याने नागरिकांचे शासकीय कामे होणार आहे



याबाबत अमोल शिवाजीराव जाधव यांनी पाठवलेल्या निवेदना द्वारे केलेली मागणी पुढील प्रमाणे 

धाराशिव जिल्हयात शासकीय महसूल कर्मचारी यांनी लेखणी काम बंदचा संप पुकारलेला आहे, तरी संप केलेला असल्यामुळे बाहेरगावाहून आलेले शेतकरी, गोरगरीब, दिनदुबळे, अपंग, वयोवृध्द महिला यांचे हेळसांड होत असून तरी आपण आपल्या अंतर्गत चालू असलेले लेखणी काम बंद मागे घेणेबाबतचा आदेश दयावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली होती


माहितीस्तव हे निवेदन अमोल जाधव यांनी ईमेलद्वारे खालील मान्यवरांना पाठवण्यात आले होते


१) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई


२) मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई


३) मा.ना. अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा