*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
शब्दकळा साहित्य संघ,मंगळवेढा या संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित केलेल्या बहारदार कार्यक्रमात कवी इंद्रजीत पाटील यांना 'शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार - २०२४' ने सन्मानित करण्यात आले.हा मानाचा व महाराष्ट्रात बहुचर्चित असणारा पुरस्कार त्यांच्या ' कळ पाेटी आली आेठी ' या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहासाठी देण्यात आला.प्रस्तुत कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष,मा.लक्ष्मणरावजी ढाेबळे,माजी पालकमंत्री,साेलापूर,मा.आ.समाधान (दादा) अावताडे,मा.आ.दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.याप्रसंगी मा.प्रा.शिवाजीराव काळुंगे,शिवानंद पाटील,शिवाजी शिंदे,डाॅ.सुरेश शिंदे,टी.एस.चव्हाण,डाॅ.प्राे.महादेव देशमुख,प्रा.दिलीप जाधव,हरीश बंडीवडार,मनाेहर मुधोळकर,श्रीमंत लष्करे,प्रा.डाॅ.वामनराव जाधव,अॅड.नंदकुमार पवार,आनंद पाटील,कु.संगीताताई पवार,साै.भाग्यश्री बिले-कसगावडे हे ही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कवी इंद्रजीत पाटील यांच्या या कवितासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. शब्दकळा साहित्य संघाचे अध्यक्ष, प्रा.शशिकांत जाधव यांनी सदर कार्यक्रमाचे फार उत्तम नियाेजन केले. साहित्यिक इंद्रजीत पाटील यांचा शेलक्या बारा हा कथासंग्रह व कळ पाेटी आली आेठी हा अष्टाक्षरी कवितासंग्रह ही दाेन्हीही पुस्तके सद्या प्रकाश झाेतात आहेत.त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून नातेवाईक,मित्रवर्य तसेच सर्व बार्शी तालुक्यातून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा