Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ जानेवारी, २०२५

*चांदापुरी ता.माळशिरस येथील ओंकार साखर कारखान्यावर प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा*

 


*निमगाव ----प्रतिनिधी*

 **रामचंद्र मगर*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

ओंकार साखर कारखाना चांदापुरी ७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजरोहन ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे होते 

या वेळी बोलताना प्रशांत बोञे पाटील म्हणाले ङाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना सर्वसामान्य माणसाचे कामगारांचे समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून घटना तयार केली ही कौतुकास्पद बाब आहे 

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली ऊस उत्पादक शेतकरी कामगार ऊस वाहतुकदार ऊस तोङणी कामगार यांचे हित जोपासुन पारदर्शक कारभार करून या भागाचा कायापालट केला असे म्हणाले या वेळी कर्मचारीवर्ग व सुरक्षा रक्षक यांना खाऊचे वाटप करण्यात आले या वेळी मेजर मोहन घोडके केन मॅनेजर शरद देवकर चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते धनाजी पवार गणेश धायगुङे अमोल तरंगे ऊस उत्पादक शेतकरी रामचंद्र मगर नितीन जाधव बापु वाघमोङे आभार रमेश औताडे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा