*यशवंतनगर---प्रतिनिधी*
*नाजिया. मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
व्यायाम हीच काळाची गरज ओळखून भावी काळात निरोगी आरोग्य हीच संपत्ती आहे.
डॉ. सौरभ गांधी.
हृदयरोग तज्ञ, अकलूज.
महर्षि संकुल यशवंतनगर येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला .कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश शेजुळ तहसीलदार माळशिरस ,डॉ. सौरभ गांधी हृदयरोग तज्ञ अकलूज ,प्रशाला समिती सभापती नितीनराव खराडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून संकुलातील स्काऊट व गाईडची पथके तसेच वाहतूक सुरक्षा व नागरी सेवा दल पथकांमार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. महर्षि संकुलाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तीचे प्रतीक असणारी सामूहिक कवायत सुंदर पद्धतीने सादर केली. देवगिरी चुंगे ,साक्षी पाटील ,संस्कृती म्हमाणे या विद्यार्थिनींनी आपल्या तडफदार भाषा शैलीतून प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
मैदानी स्पर्धेत राज्य पातळीवरील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
शरीर माध्यम खलू धर्म साधनम या उक्तीला अनुसरून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मानवी मनोरे सादरीकरण केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात महर्षि प्रशालेने शिवकालीन मर्दानी खेळ लेझीम तर लक्ष्मीबाई कन्या प्रशालेने वतन मेरा इंडिया देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
डॉ.सौरभ गांधी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यायाम हीच काळाची गरज ओळखून भावी काळात निरोगी आरोग्य हीच संपत्ती असा संदेश दिला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे ,अनिल जाधव, विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख, लक्ष्मण लावंड,अमृता देशमुख ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,अनिता पवार, उप- मुख्याध्यापक भारत चंदनकर, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे ,सर्व शिक्षक वृंद व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान यांनी केले .प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा