Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ जानेवारी, २०२५

*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन साजरा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल 'प्रजासत्ताक दिन' विशेष


आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी स्वतंत्र भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन सोहळा 'शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये' भारत मातेला वंदन करून मंगलमय अशा वातावरणात पार पडला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सत्कारमूर्ती कु. सपना सुरेश गोडसे- पाटील (Assistant Commissioner of Food Department MH ) त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून लाभलेले एल एम सी मेंबर मा श्री शंकर काशिनाथ गायकवाड सर,तसेच मा श्री एच डी भोसले सर, माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ सुषमा रुपेश शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध अशा संचलन आणि कवायतीचे सादरीकरण करण्यात आले.संचालनामध्ये प्रमुख म्हणून गायत्री गायकवाड व ध्वजवाहक म्हणून झेनब शेख यांनी उत्कृष्ट काम केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षांची निवड प्रशालेतील शिक्षिका सौ शिल्पा जाधव मॅडम यांनी केली तर सौ ज्योती घोडे मॅडम यांनी अनुमोदन दिले. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र माने देशमुख सरांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची वाटचाल आणि विकासाचा आराखडा मांडला.


कार्यक्रमाला लाभलेल्या कर्तुत्ववान पाहुण्या तसेच इतर मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक माननीय श्री जितेंद्र माने देशमुख सरांच्या हस्ते संपन्न झाला.

तसेच शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे एल एम सी मेंबर माननीय श्री शंकर काशिनाथ गायकवाड सर यांनी प्रशालीतील बँड पथकासाठी दहा हजार रुपयांचे साहित्य भेट दिले त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला


 *यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये* 

जिया जमीर शेख

शिवराज अमोल मिरगणे

समर्थ सागर कांबळे

मुदस्सीर इम्तियाज अहमद शेख

कृतिका किशोर साठे

जैनब इम्तियाज अहमद शेख

आणि शिक्षक मनोगतामध्ये प्रशालेतील शिक्षक श्री गणेश शेवकर सरांनी भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास थोडक्यात मांडला.


यानंतर विविध गुणदर्शनपर कार्यक्रमाची मेजवानी सर्वांना मिळाली. यामध्ये लाठी- काठी, दांडपट्टा तसेच मानवी मनोरे असे साहसी प्रकार पाहायला मिळाले तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी विविधतेत एकता यावर आधारित अतिशय सुंदर असे देशभक्तीपर गीत सादर केले तर पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्तीपर गीतातून क्रांतिकारकांना वंदन केले.या दोन्ही गीतासाठी सौ शिल्पा नारायनकर यांनी विशेष परिश्रम घेतले

 तदनंतर प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाचे तरुण- तडफदार नेतृत्व असलेल्या प्र.पाहुण्या कु.सपना सुरेश गोडसे पाटील यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्वांचे तोंड भरून कौतुकही केले.


 देशप्रेमाचा दिवा सर्वांच्या मनामध्ये प्रज्वलित करत संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तमन्ना नाईकवाडी मॅडम तर आभार प्रदर्शन श्री गणेश शेवकर सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा