उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
गणेशगावचे माजी सरपंच सौ.उषा रामचंद्र ठोंबरे यांची कन्या डॉ.प्रतीक्षा उषा रामचंद्र ठोंबरे यांनी रशियामध्ये राहून एम.बी.बी.एस ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च डिग्री २०१८-१९पासून२०२३-२४ पर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केली व भारतात वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी भारतीय वैद्यकीय बोर्डाने निर्धारित केलेली एफ.एम.जी.ई या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्कृष्ठ गुण मिळवले आहेत. व भारतात डॉक्टर म्हणून कार्य करण्यासाठी योग्यतेचे प्रमाणपत्र प्रयत्नांच्या जोरावर दिवसातील १५ ते १६ तास अभ्यास करून मिळविले आहे. शेतकरी आई वडिलांचा चेहरा व त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अथक प्रयत्न करून जिद्द आणि चिकाटीने यश खेचून आणले व आई वडिलांचे मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न तीने सत्यात उतरविले आहे.लेकीने उंच भरारी घेण्यासाठी तिच्या पंखांना बळ देणा-या आई वडिलांना लेकीची गरुडझेप पाहून आनंद गगनात मावेनासा झाला आहे.कोरोना काळात बिकट प्रसंग ओढवला असतानाही आई वडिलांची खंबीर साथ तिला स्वप्न पूर्तीसाठी प्रेरक ठरली. प्रतिक्षाचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्रेरणा देत आहे .पंचक्रोशीत सर्वत्र तिच्या या यशाचा बोलबाला दिसत आहे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रतीक्षा आता सज्ज झाली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा