Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

*यशवंतनगर येथील' लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत'- क्रांतीज्योती-- "सावित्रीबाई फुले "जयंती साजरी*


 

*अकलूज---प्रतिनिधी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन उच्चशिक्षित व्हावे .

 लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे थोर समाजसेविका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिसावित्रीबाई बनून आलेल्या विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका पवार मॅडम, शिक्षक वृंद यांचे शुभ हस्ते करण्यात आले.



यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य याविषयी माहिती दिली. शिक्षक मनोगत .कुंभार सर व बनसोडे सर यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना सावित्रीबाई फुले यांच्या काळातील सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीवर भाष्य केले. मुलींना घराबाहेर पडण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांनी सुरुवातीला आपल्या पत्नीला सुशिक्षित केले. त्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी शालेय वर्ग सुरू करण्यात आले. समाजाचा विरोध पत्करून, तत्कालीन रूढी व परंपरेला छेद देऊन सावित्रीबाई फुले यांनी विद्यार्थिनींना सुशिक्षित केले. या कार्यामुळे त्यांना क्रांतीज्योती म्हणून ओळखले जाते. असे मत व्यक्त केले.



 रणनवरे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन निमित्त विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या व आपणही त्यांच्यासारखे परखड राहिले पाहिजे असे आवाहन केले. विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे तरच सामाजिक क्षेत्रात निश्चित बदल होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 9 वी ब वर्गाने केले. सूत्रसंचालन .धनश्री काळे व .श्रेया काळे यांनी केले. अनुमोदन .नेहा साठे हिने दिले. आभार अपेक्षा भोसले हिने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा