*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पीक आहे . महाराष्ट्राची आर्थिक ' समाजिक व शैक्षणीक प्रगती होण्यास खारीचा वाटा आहे. माळशिरस तालुका विचार करता ५ साखर कारखाने आहेत अंदाजीत हंगामामध्ये ३०ते ३५ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप केले जाते यातील १० % क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन केले जाते ते १००% पर्यत वाढविणे गरज आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते व बरेच जोडधंदे व आर्थिक चलन फिरते . तालुक्यातील एकूण उसाखालील क्षेत्रापैकी ३५ ते ४० % क्षेत्रावर खोडवा पीक घेतले जाते व उत्पादनात २५ ते ३० % हिस्सा आहे. वाढलेले रा. खत निविष्ठ व मंजूरीचे दर या हातातील नसलेल्या उत्पादनातील बाबीवर पर्याय शोधून खोडवा ऊस उत्पादन खर्च करणे हा एकमेव पर्याय आपणाकडे आहे. त्यासाठी खोडवा पीकातील पाचट व्यवस्थापन या बाबीचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे. ऊसाचे पाचटात ०.५ % नत्र ' ०.२% स्फुरद' ०.७ ते १ % पालाश व ४०% सेंद्रीय कर्बचा एक काडी लावून पोतभर राख करण्यापेक्षा यांचे संवर्धन करून पिकास उपलब्ध करून देणेसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी पाचट व्यवस्थापन पद्धती विकसित केली आहे . त्याचा वापर करणे गरज होऊन बसली आहे. आधूनिक प्रयोगाअंती सिद्ध निष्कर्षा आधारे त्यांनी पटवून दिले आहे.
१ हेक्टर ऊस पिकातून ८ ते १० टन पाचट मिळते आणि त्याचे व्यवस्थापन केले तर त्यापासून ४० ते ५० किलो नत्र - २ युरियापोती ' २० ते ३० किलो स्फुरद - २ पोती सिंगल सुपर फॉस्फेट ' ७५ ते १०० किलो पालाश म्हणजे -२ पोती म्युरेट ऑफ पोटेश वं ३ ते ४ हजार किलो सेंद्रीय कर्ब जमिनीत मिसळविण्यास मदत होते . व हेक्टरी पाचट व खोडवा व्यवस्थापन या पद्धतीने केले तर एकूण खर्चान ३५ ते ४० हजाराची बचत घेऊन इतर सर्व फायद्यासह १० ते १५ उत्पादनात वाढ होते . तालुका मंडळ मधील जमिनील सेंद्रीय कर्ब प्रमाण ०. ५ पर्यत खाली आले आहे व सतत घेण्यात येणा ऱ्या पीका मुळे जमिनिची जैविक ' भौतीक ' रासायनिक गुणधर्म बिघडले आहेत. आपले वारसाना जर जमिन पिकाऊ उत्पादन क्षम सोपविण्याची असेल तर या बाबीकडे लक्ष देणे नित्य गरजेचे आहे. उपलब्ध महितीच्या आधारे ३५ ते ४०% खोडवा पिक क्षेत्रापैकी सर्वसाधारण पणे१० % क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन केले जाते . यामागचे कारण म्हणजे मशागत अडचणी 'आंतरपिक घेता येत नाही ' तणाचा बंदोबस्त हे गैरसमज आहेत. परंतू मध्यवर्ती ऊस संशोधन शास्त्रज्ञ यांनी हे गैर समज दूर केले आहेत. १५ फेब्रुवारी पर्यत तोडलेल्या आडसाली पूर्वहंगामी व सुरु ऊसाचा खोडवा ठेवता येतो व त्याचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे . ऊस तोडणी झाले नंतर पाचट कुट्टी ' ऊस पाचट मल्चर चे सहाय्याने एकरी २६०० रुपये ३००० रुपये दराने टैक्टर चालीत यंत्राचे सहाय्याने पाचट कुट्टी करून घ्यावी जर ऊस तोडणी ऊस हार्वेस्टरने झाली असेल तर उस तोडणी बरोबर पाचट कुटीही होते व तोडणी मनुष्य बळाने केली असेल तर ही यंत्रे राज्य पुरस्कृत यांत्रीकरण अभियान ' राष्ट्रीय कृषि विकास यांत्रीकरण अभियान ' कृषि यांत्री करण उपअभियान अंतर्गत ४० ते ५० % अनुदानावर उपलब्ध आहेत . याचा वापर करून पाचट कुट्टी व पाचट मल्चर करून घ्यावे . तदनंतर एकरी १ मजूरा कडून वर - खाली तुटलेली ऊस खोडे जमिनीलगत तोडून घ्यावीत . व बुरशीचा प्रार्द्रभाव रोखणेसाठी ०१ % बीवीस्टीन फवारणी करावी यानंतर प्रति हेक्टर ८० किलो युरिया १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे . तदनंतर ४०० लिटर पाणी + ५ किलो गुळ + ५० मिली निळ + १० किलो कंपोस्ट कल्चर / पाचट कुजविणारे जीवाणू चे द्रावण स्प्रिकरलचे किंवा मनुष्या सहाय्याने पाचटावर फवारणी करावे . फवारणी की द्वावण शिंपडलेनंतर मजुरांचे सहाय्याने पाचट सरीत दाबून घ्यावे व तदनंतर बैलाचे सहाय्याने किंवा पॉवटर टिलर ने बगला फोडून पाचटावर माती टाकावी. पाचटाचा मातीचा संबंध अलेने पाचट कुजण्यास मदत होते. पाचट व्यवस्थामुळे बष्पीभवनाचा वेग कमी घेतो 'ओलावा टिकून राहतो ,तणाचा प्रद्रूभाव कमी होतो ' जमिनीची जलधारण शकती वाढ होते ' नैसर्गिक गांडूळ वाढ होते ' सेंद्रीय पदार्थ विघटनामुळे मुख्य दुय्यम सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्धता . वाढते ' जमिनीचे तपमान कमी घेऊन सुक्ष्म वातावरण निर्मिती होते ' सेंद्रीय कर्ब विघटनामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईन जे पीकास अन्न तयार करणेस उपयुकत आहे त्यांचे प्रमाण ३०० पीपीएम पेक्षा .वाढ होते . आंतरपीक घेता येतात ' पारंपारिक २३ ते २४ पाण्याचे पाळी चे प्रमाण कमी घेऊन १२ ते १३ पाणी पाळ्यात पीक काढणीस येत ' व जमिनिचा सामू ०.०८ % ने कमी होणेस ' नत्र ६ किलो प्रति हेक्टर . स्फुरद -९ किलो प्रति हेक्टर वाढ होऊन जमिनिची विदयुत वाहकता o . वने वाढते सेंद्रीय कर्ब .०४ वाढ होते ' जमिनिची घनता ० .०३ ग्रॅम / सेंमी ने कमी घेऊन जमिनीचे रासयनिक गुणधर्म सुधारणा होते . या सर्वाचे दृष्य अनकुल परिणाम मुळे खर्च बचत जमिनीचे गुणधर्म सुधारणासह राष्ट्रीय संपत्ती बचत होऊन ' खर्चातील एकरी १३ ते १४ बचतीसह १० ते १५ % उत्पादनात वाढ होते . तरी या सर्व बाबीचा फायदयाचा विचार करता खर्च बचतसह उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधूनी खोडवा पिकासाठी १०० % पाचट व्यवस्थापन करण्याचे अहवाल अकलुज मंडळ कृषि अधिकारी कार्यालियाने केले आहे व अधिकचे माहितीसाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय अधिकारी यांचेशी संर्पक करावा ही विनंती !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा