*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाविद्यालयाने आपली गुणवत्ता टिकवावयाची असेल तर नॅक मुल्यांकन करून घेणे आवश्यक आहे.यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने टास्क फोर्स, फोरम,क्लब,करिअर कट्टा इत्यादी स्थापन करणे आवश्यक आहे.यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीस मदत होते असे मत डी.पी.भोसले महाविद्यालय कोरेगावचे नॅक समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ.भगवान लोकडे यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान,उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापुर पुरस्कृत परिस स्पर्श योजने अंतर्गत शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने मेंन्टी महाविद्यालयासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.या परिस स्पर्श योजनेच्या एकदिवसीय कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.टिळेकर होते.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्वांनी एकजुटीने काम केल्यास नॅक मुल्यांकन प्रक्रिया सोपी होते असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.सतीश देवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रविराज सोनवणे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब बाबर यांनी केले. सदर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल दत्तात्रय पाटील,प्रबंधक राजेंद्र बामणे, कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. विश्वनाथ आवड व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक तसेच मेंटी महाविद्यालयातिल प्राचार्य डॉ.सुभाष शिंदे,प्राचार्य डॉ.देशमुख व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा