*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
विशाळगडावरील उरूसास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने स्थानिकांनी उरूसातील दुसर्या दिवशी संदल विधी म्हणजे गंधरात्र साध्या पद्धतीने पार पाडला. संदल विधी दर्ग्याचे मानकरी शराफत रहिम मुजावर यांचे हस्ते झाला.
सोमवारी उरूसाचा दुसरा दिवस पारंपरिक वातावरणात पार पडला. रविवारी उरूसाच्या पहिल्या दिवशी चुना लावण्याचा विधी उत्साहात झाला. दोन्ही दिवस धार्मिक विधी मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यात पार पडले. यावेळी मुबारक मुजावर, आयुब कागदी, पोलिस पाटील उपस्थित होते. आज मंगळवारी (दि. 14) गलेफ चढविण्याचा धार्मिक विधी चाँद इमारतीत होईल. तुरबतीवर पुष्पहार, चादरी व श्रीफळ वाहून भाविकांनी दर्शन घेतले. पर्यटकांसाठी हॉटेल, शीतपेय, श्रीफळ, फुलांच्या चादरी, प्रसादाची दुकाने थाटली आहेत.
शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने विशाळगड चौक, पायथा, गजापूर व केंबुर्णेवाडी या चार ठिकाणी सुमारे सत्तरहून अधिक पोलिस कर्मचारी व तीन अधिकारी पोलिस बंदोबस्तास पथके आहेत. प्रत्येकाचे ओळखपत्र तपासून, नाव नोंदणी करून गडावर सोडले जात असल्याचे शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी स्पष्ट केले. पहिल्या दिवशी एक हजाराहून अधिक तर दुसर्या दिवशी साडेसातशे पर्यटक व भाविकांनी गडाला भेट दिली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा