*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सातारा, दि. ६: महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय, कापसेवाडी, जावेली येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात मोहसीन शेख यांचा सन्मान करण्यात आला. बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक मोसिन शेख यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांना सन्मानपत्र, शाल, घड्याळ, पेन, पुष्पगुच्छ व "अनाथांचा नाथ" हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात राष्ट्रीय शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील, अॅड. विलास वहागावकर, माजी अभियंता शामराव शिरतोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संवाद नात्याचा - कवी डॉट कॉम निमित्त विशेष कवी संमेलनही झाले, ज्यात रुद्राक्ष पातारे, प्रसाद माळी, नारायण लांडगे-पाटील, अनुकूल माळी, अनिल सपकाळ, रेश्मा जांभळे अशा अनेक कवींनी कविता सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक करडे यांनी केले, तर सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, नवी मुंबईचे अध्यक्ष रमेश संकपाळ यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. भीमराव धुळप धगधगती मुंबई दैनिकाचे संपादक भीमराव धुळप यांनी आभार मानले.
**चौकट*
- मोहसीन शेख यांचा सन्मानपत्र, शाल, घड्याळ, पेन, पुष्पगुच्छ व "अनाथांचा नाथ" पुस्तक देऊन सन्मान
- बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक मोसिन शेख यांची विविध क्षेत्रात भरीव कामगिरी
- राष्ट्रीय शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील, अॅड. विलास वहागावकर, माजी अभियंता शामराव शिरतोडे यांची उपस्थिती
- विशेष कवी संमेलनात रुद्राक्ष पातारे, प्रसाद माळी, नारायण लांडगे-पाटील, अनुकूल माळी, अनिल सपकाळ, रेश्मा जांभळे यांची कविता सादरीकरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा