*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्षपदी शिवमती मनोरमा लावंड यांची नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष शिवमती सिमाताई बोके,प्रदेश सचिव स्नेहाताई खेडेकर,प्रदेश सदस्य शिवमती सत्यभामा पाटील,प्रदेश सदस्य अक्काताई माने,प्रदेश सदस्य प्रियाताई नागणे,ज्येष्ठ मार्गदर्शिका नंदाताई शिंदे मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष हेमलता मुळीक व सचिव शिवमती वनिता कोरटकर उपस्थित होत्या.
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या ७५ व्या वाढदिवस बालगंधर्व पुणे येथे खूप मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी पुरूषोत्तम खेडकर व शिवमती रेखाताई खेडेकर यांनी शिवमती मनोरमा लावंड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना मनोरमा लावंड म्हणाल्या की,पंढरपूर विभागातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, खेडोपाडी जिजाऊ ब्रिगेडची शाखा काढून पुरूषोत्तम खेडेकर यांची विचारधारा प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन असे सांगितलं.
*चौकट*
शिवमती मनोरमा लावंड यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षा असताना विविध सामाजिक उपक्रम राबविले होते.यामध्ये माळशिरस तालुक्यातील महिलांनी आपल्या आप्तेष्टांसाठी किडनी दान केलेल्या महिलांचा भव्य सत्कार करण्यात आला.ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना कपडे व खाऊ वाटप केले आहे. चिपळूण येथे पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. महिलांना व्यवसाय करण्यासाठी विविध कोर्सेचे आयोजन करण्यात आले होते.नवरात्र महोत्सवात नवदुर्गांचा सन्मान केला आहे.असे भरीव कामगिरी त्यांनी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा