*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
लातूर येथे तिसरे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.त्या संमेलनात माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव येथील कवयित्री नूरजहाँ फकरूद्दीन शेख यांना २०२५ चा फातिमाबी शेख साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था,महाराष्ट्र (शाखा-लातूर) यांनी आयोजित केलेल्या तिसरे राज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे सुप्रसिध्द साहित्यिक लेखिका मलेका महेबूब शेख - सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.त्यामध्ये गणेशगांव येथील कवयित्री नूरजहाँ फकृद्दीन शेख यांना त्यांच्या लेखणीद्वारे मुस्लिम मराठी जाणिवांना अभिव्यक्त केले व वाडमयीन विश्वात मोलाची भर घातली आहे.त्यांचे माझं शिवार मराठी काव्यसंग्रह व मन की लहरे हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या व सामाजिक समस्यांवर प्रखर लेखाणाद्वारे वृत्तपत्रातून आवाज उठवला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा साहित्यरत्न फतिमाबी शेख हा पुरस्कार २०२५ चा पहिल्या संमेलनाध्यक्षा अणीसा सिकंदर शेख यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.यापुर्वी हि त्यांना अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय ग्रामपंचायत पुरस्कार,काव्य सम्राज्ञी पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत.या संमेलनात महाराष्ट्रातून नामवंत कवी सहभागी झाले होते.
कवयित्री व पत्रकार नूरजहाँ शेख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सा.गावकुसचे संपादक विष्णू बिचकुले,पत्रकार संजय लोहकरे, टाइम्स 45 न्यूज मराठी चे संपादक -हुसेन मुलाणी,फिनिक्स स्कूलचे पालक संघ अध्यक्ष नीलेश वाघ, उपाध्यक्ष महादेव कोळेकर, महिला पालक संघ अध्यक्षा शीतल भुजबळ उपाध्यक्षा माया कोळी यांनी त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पहार,पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा