*शंकरनगर----प्रतिनिधी*
*नाझिया. मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अस्तित्वाची जाणीव ठेवून कर्तुत्वाची छाप पडत नेतृत्वाचे आयाम अंगिकारून सोलापूर जिल्ह्याचे कायापालट करणारे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील हे वाघच!
समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे
अध्यक्ष, कामधेनू परिवार.
महर्षि संकुल यशवंतनगर येथे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली .सदर जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय यशवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला .यावेळी प्रमुख अतिथी समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार ,पांडुरंग माने देशमुख शाखाधिकारी डीसीसी बँक, प्रशाला सभापती नितीनराव खराडे यांच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या ठाई असणाऱ्या सहकार, कर्तृत्व, व्यायाम,गोरगरिबांविषयी कळवळा या गुणांची जाणीव करून दिली. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्याला उजाळा देणारे महर्षि गीत यावेळी सादर करण्यात आले.
संकुलातील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
संकुलातील रुद्रा घाडगे, श्रेया कदम ,किर्ती साठे व भूमिका कारमकर यांनी आपल्या भाषणातून सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवन कार्यावर शब्दांजली वाहिली.
प्रमुख अतिथी समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे यांनी आपल्या मनोगतातून सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या गौरवशाली कार्याचा परिचय करून दिला.
अस्तित्वाची जाणीव ठेवून कर्तुत्वाची छाप पडत नेतृत्वाचे आयाम अंगिकारून सोलापूर जिल्ह्याचे कायापालट करणारे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील हे वाघच असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, नवनाथ पांढरे, कैलास चौधरी, विनोद जाधव, जया गायकवाड, नितीन इंगवले देशमुख, मुख्याध्यापिका अनिता पवार ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व प्रतिभा राजगुरू यांनी केले तर आभार शिवाजी पारसे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा