Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ५ जानेवारी, २०२५

*अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात वार्षिक स्नेहसंमेलन 'जयोत्सव "चे उद्घाटन*

 


*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा, अकलूज प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन "जयोत्सव" २०२४-२०२५ चे उद्घाटन संपन्न झाले.

      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील तथा दादासाहेब उपस्थित होते.तसेच प्रशाला समितीच्या सभापती, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष .स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तथा दिदीसाहेब उपस्थित होत्या.तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, प्रशाला समितीचे सदस्य,तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम उपस्थित होत्या.प्रथमतः प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवर रंगमंचावर स्थानापन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम यांनी केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व  दीपप्रज्वलन करण्यात आले.तद्नंतर आपल्या सर्वांचे लाडके माननीय दादासाहेब यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थी कलाकारांचे गोड कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर "आनंदयात्री बालवाद्यवृंद" कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात  सहकार महर्षि काकासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून महर्षि गीताने करण्यात आली. त्यानंतर "मेरा मुल्क मेरा देश" हे देशभक्तीपर गीत मा.दादासाहेब, मा.दिदीसाहेब तसेच उपस्थित सर्व पालक वर्ग सर्वांनी मोठ्या आवाजात ,उत्साहात व आनंदात हे गीत गायन केले.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गाणी उत्कृष्ठपणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.यावेळी समोर उपस्थित पालक वर्गाने ही विद्यार्थी कलाकारांना दाद दिली.

       


         त्यानंतर इयत्ता ४ थी व २ री मधील विद्यार्थ्यांनी समूह नृत्याचे सादरीकरण केले.यामध्ये दिंडी गीत, संदेश गीत, देशभक्तीपर गीत, आदिवासी गीत,गवळण गीत असे विविध नृत्य प्रकारांचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले.त्यानंतर झालेल्या गीतांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यामधून प्रथम,द्वितीय व तृतीय असे क्रमांक देण्यात आले.यावेळी समूहनृत्य सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले महादेव आठवले औदुंबर सूर्यकांत भिसे , धीरज गुरव उपस्थित होते.


    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश सूर्यवंशी सर व .प्रदीप मिसाळ सर यांनी केले.शेवटी सारे जहाँसे अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा