*सोलापूर--- प्रतिनिधी*
*आबिद बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर - चॅरिटी प्रिमियम लीग २०२५ - सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात धर्मादाय आयुक्तालय पुणे तर्फे महाराष्ट्राचे महागायक मोहंम्मद अयाज यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं हा मानपत्र सन्माननीय रजनी क्षिरसागर धर्मादाय सह आयुक्त पुणे व सन्माननीय संभाजी ठाकरे साहेब ( धर्मादाय सह आयुक्त अमरावती ) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .या वेळी पुणे धर्मादाय चे उप आयुक्त माननीय डाॅ राजेश परदेशी साहेब तसेच धर्मादाय पुणे चे सहाय्यक आयुक्त मा . रेश्मा पुनसे , मा. पी पी चव्हाण , मा. राहुल मामु सह एम आय टी युनिव्हर्सिटी पुणे चे सन्माननिय अतिथी गण उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई पुणे सह महाराष्ट्र भरातुन अधिकारी वर्ग आपली उपस्थिती दर्शविली हा कार्यक्रम शनिवारी दिनांक १८ रोजी लोणी काळभोर पुणे येथील एम आय टी युनिव्हर्सिटी च्या डोम समोरच्या प्रांगणात पार पडला . डोळ्याचे पारणे फेडणारे असा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात मोहंम्मद अयाज यांनी एका हुन एक सरस गीते गाऊन समस्त धर्मादाय आयुक्तालय पुणे यांना भाराऊन टाकले या वेळी गायक मोहंम्मद अयाज यांनी एम आय टी चे संस्थापक चेअरमन माननीय प्रैफेसर डॉ मंगेश कराड साहेब आणी महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त सन्माननीय अमोग कलोटी साहेब यांचा मी सदैव ऋणी आहे हा सन्मान माझा नसुन माझ्यावर व माझ्या कलेवर प्रेम करणारे रसिक श्रोत्यांना अर्पण करत आहे असे प्रतिपादन केले मोहम्मद अयाज यांनी केले .
----------------------------------------
फोटो मधे - मानपत्र प्रदान करताना श्रीमती रजनी क्षिरसागर ( धर्मादाय सह आयुक्त पुणे) श्री संभाजी ठाकरे ( धर्मादाय सह आयुक्त अमरावती ) डॉ राजेश परदेशी ( धर्मादाय उप आयुक्त पुणे ) गायक मोहम्मद अयाज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा