*अविनाश देशमुख-- शेवगाव*
*मो:--99600 51755
! शेवगांव शहरात राज्यमहामार्गावर भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे क्रांती चौकात तब्बल दोन तास वाहतूक ठप्प,नागरिकांचे झाले मोठे हाल परण्या मिरवणुकीचे नवरदेवही अडकले वाहतुकीत मेकअप साठी पार्लर ला गेलेली नवरीही ट्राफिक मध्ये अडकली
या बाबत सविस्तर वृत्त असे की लगीनघाई, शेवगावात वाहतूक कोंडी नेहमीचीच झालेली आहेशेवगांव शहरात राज्यमहामार्गावर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे क्रांती चौकात तब्बल दोन तास वाहतूक ठप्प,नागरिकांचे झाले मोठे हाल परण्या मिरवणुकीचे नवरदेवही अडकले वाहतुकीत मेकअप साठी पार्लर ला गेलेली नवरीही ट्राफिक मध्ये अडकली क्रांती चौक आंबेफकर चौक या वर्दळीच्या ठिकाणी नियुक्तीस असलेले ट्राफिक पोलीस जागेवर सापडत नाहीत गेल्या रविवारी लग्नाचा मुहूर्त त्यात शेवगावाचा राज्य महामार्गावर भरणारा आठवडे बाजार.. शहरात ठिकठिकाणी विवाह सोहळे असल्याने अक्षता टाकण्यासाठी प्रत्येकालाच लगीनघाई झालेली.. त्यात रस्त्यावर लावलेली वाहने,विनापरवाना डि.जे.चा दणदणाट अन् त्यावर बेधुंद मद्यधुंद होऊन रस्त्यावरच नाचणारी तरुणाई... यामुळे शेवगाव शहरातील वाहतुकीचे रविवारी १९ जानेवारी भर दुपारी तीन तेरा वाजले.... 'शहरातील गाडगेबाबा चौक, क्रांती चौक, नित्यसेवा हॉस्पिटल रोड, नेवासा रोड आणि मुख्य बाजारपेठेत वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक तब्बल दोन तास अक्षरक्षः ठप्प झाली होती. शेवगावचा आठवडे बाजार दर रविवारी भरतो.. बहुतांश विक्रेते हे रस्त्याच्या बाजूलाच बसतात. कठड्यावर बसतात *त्यात शहरातील काही अतिशहाणे दुचाकीवरच बसून बाजार करतात* त्यामुळे विक्रेते अन् बाजारकरूंचा रस्त्यावरच 'बाजार' भरलेला असतो. त्यात रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने शहर परिसरात अनेक ठिकाणी लग्न सोहळे सुरू होते. आठवडे बाजार अन् एकाच वेळी विवाह सोहळ्याची गर्दी झाल्याने अवघे शहर आठवडे बाजारामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली. शहर 'जॅम' झाले होते. काही नवरदेवांच्या गाड्याही या कोंडीत अडकून पडल्या. त्यामुळे साहजिकच त्यांचा विवाह मुहूर्त टळला.. साडेबाराच्या लग्नाला साडेतीन वाजले शहरातील काही भागात वाहतूक कोंडी इतकी होती की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किमान दोन तास लागत होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. लग्न समारंभांना उशीर होत असल्याने अनेकांचे कार्यक्रम हुकले. शेजारील तालुक्याचे लोकप्रतिनिधींना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
*ताजा कलम*
*शेवगांव नगरपरिषदेच्या मालकीचे अतिक्रमण केले सुमारे 65 भूखंड नगरपरिषद हद्दीत असुन आठवडे बाजारासाठी पर्यायी जागा शोधणे, हे नवनियुक्त कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौ विजया घाडगे यांच्या समोरचे मोठे आव्हान आहे नेवासे रोडवर वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि शहरातील अतिक्रमणे हटवणे. वाहने रस्त्यावर उभी न करता वाहनतळाची व्यवस्था करावी, असा सूर नागरिकांमधून उमटत होता. शहरातील प्रश्नावर स्थानिक नगरपरिषद महसूल व पोलीस प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे. शहराच्या तिन्ही बाजूस साखर कारखाने असल्याने ऊस वाहतूक करणारे परवानगी नसलेले विनाक्रमांकाचे जुगाड ट्रॅक्टरला असलेल्या विनाक्रमांकचा डबल ट्रेलर, तसेच मालवाहतूक गाड्या, मोटारसायकली मुळे वाहतूक कोंडी होते.
खंडोबा मैदानात बाजार भरवावा अशी मागणी आहे परंतु देवस्थान चे विश्वस्त अव्वाच्या सव्वा भाडे मागत असल्याने
प्रत्येक रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी शेवगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे हा आठवडे बाजार हा रस्त्यावर न भरवता खंडोबा मैदानात भरवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याकडे नगरपरिषदे ने लक्ष घालून बाजार रस्त्यावर भरवण्यापेक्षा मोठी जागा असेल, त्या ठिकाणी भरवण्याची गरज आहे अनेक अपघातही झाले आहेत. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाहनाचच्या साउंड चा कर्णकर्कश आवाज करून वाहने चालवतात.*
*{ क्रमशः}*
शेवगावला वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हा प्रश्न कायमचा कसा मार्गी लागेल, याकडे लक्ष द्यावे. माजी खा. सुजय विखे यांनी बाह्यवळण रस्त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आले. आता या प्रश्नाकडे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा