Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ जानेवारी, २०२५

हिंदू - मुस्लिम मिश्र समाजाचे जगणे - वागणे शतकानुशतकाचे आहे प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज चॅनल


तिसऱ्या फातिमाबी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ


 मुस्लिम मराठी साहित्याची व्याख्या मराठी साहित्यिकांनी आपल्या वैचारिक धारणेनुसार मांडलेली आहे. मुस्लिमांनी जेवढे साहित्य लिहिले त्याची पुरेशी दखल मराठी साहित्यात घेतलेली नाही. त्या साहित्याची वेळोवेळी अवहेलना झाली. साहित्य कोणत्या दर्जाचे आहे, याकडे लक्ष न देता जातीवादाच्या मन:प्रवृत्तीतून त्याला नाकारले गेले. मुस्लिमा विषयी असणारा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन त्यामागचे कारण आहे. हिंदू - मुस्लिम संस्कृती अनेक काळापासून एकत्र नांदत आहे. या दोन्ही समाजाचे मिश्र जगणे - वागणे शतकानूशतके येथे चालत आले आहे. त्यामुळेच आपला देश अखंड आहे. असे प्रतिपादन कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथील प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यांनी केले



              लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँक येथे ग्रामीण मराठी मुस्लिम साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य शाखा, लातूरच्या वतीने आयोजित तिसरे फातिमाबी मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्याच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मलेका महबूब शेख-सय्यद ह्या होत्या. पुढे बोलताना डॉ. कटारे म्हणाले," फातिमाबी यांचा शिक्षणाचा वारसा मुस्लिम समाजातील तरुणीने चालविला पाहिजे. महाराष्ट्रीय संताच्या सोबत एकतेचा संदेश तेराव्या शतकात मुस्लिम संतांनी दिलेला. त्याचा प्रचार आणि प्रसार होणे काळाची गरज आहे. संत शेख सलीम यांनी, आम्ही जातीचे ब्राह्मण !आमचे सोयरे मुसलमान ! स्नान संध्या बोलविली ! महाराशी सोयरी केली !! अशी एकतेची आणि समानतेची मांडणी मुस्लिम संतांनी केली आहे. हे मराठीच्या अभ्यासक्रमात येणे महत्त्वाचे आहे. मुस्लिम मराठी साहित्यामध्ये हमीद दलवाई फक्रुद्दीन बेन्नूर सोलापूर, फ.म. शहाजींदे लातूर, अजीज नदाफ सोलापूर, महबूब कादरी, हासन पटेल, तहेसीन मसुदअली सय्यद- लातूर यांनी मोठी भर घातली आहे. " 



       विचारमंचावर ॲड. उमाकांत आदमाने पुणे, बा.ह. मगदूम पुणे, संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. हासम पटेल, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कवी इस्माईल कादरसाब शेख, जिल्हाध्यक्ष तहेसीन मसुदअली सय्यद यांची उपस्थिती होती.या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशीद कासार यांनी तर आभार खालेद शेख यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा