*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी निमित्त माळशिरस शहर मेडिकल असोसिएशन तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकुंद जामदार यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
संपूर्ण भारतात आज जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.उद्घाटन प्रसंगी डॉ.जामदार म्हणाले की, वैज्ञानिक अभ्यासानुसार आता एक रक्ताची पिशवी तिघा जणांना जीवदान देऊ शकते. रक्त हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आजच्या काळात रक्ताची फार गरज आहे.रक्ता बरोबर अवयव दान,देहदान,नेत्रदान करण्यासाठी समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे.त्यांनी त्यांच्या बोलण्यातून नेत्रदान, अवयव दान व देहदान या दानांचे उदाहरण देऊन महत्व सांगितले व केमिस्ट बांधवांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
माळशिरस शहरातून ३२ केमिस्ट बांधवांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी नातेपुतेचे ज्ञानदीप ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.यावेळी माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकुंद जामदार,अभय साठे तसेच माळशिरस शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सभासद व केमिस्ट बंधू भगिनी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा