*पन्हाळा (कोडोली)---प्रतिनिधी*
*प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
"मनुष्यबळ तयार करण्याचे सर्वांत मोठे काम शिक्षण करते. प्रगत देशांइतके भारतात शासनकर्त्यांकडून शिक्षणाकडे लक्ष दिले जात नाही, " अशी खंत मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि साहित्यिक डॉ. संजय रत्नपारखी यांनी येथे व्यक्त केली. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय ( बी. एड. कॉलेज ) ,कोडोली या महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ' आजन्म नवे शिकावे ' या विषयावरील व्याख्यानात त्यांनी भारतीय शिक्षणाच्या राजकीय अनास्थेबद्दल भाष्य केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त विनिता जयंत पाटील होत्या. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील, महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रभारी प्राचार्य एच. आर. कुराडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील व्यासपीठावर होते. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील, अध्यक्षा पद्मजा प्रदीप पाटील आणि मानद सचिव व्ही. डी. पाटील यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
प्रा. एच. आर. कुराडे यांनी त्यांच्या भाषणात आदर्श शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली. तर प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाप्रती व्यक्तविलेल्या प्रेमाबद्दल ऋण व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. प्रताप पवार (पेठवडगाव ) , प्रा. नामदेव चोपडे ( वारणानगर), प्रा. प्रताप पाटील (केखले ) , प्राचार्य, ॲड. मंदार पसरणीकर, प्रा. सारिका शिर्के ,प्रमोदिनी नराटे ( तिघे रा.कोडोली ) , सुनीता संजय पाटील ( शाहुवाडी ) या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयविषयक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रा. ए. जी. लोकरे यांनी प्रास्तविक केले. प्रा. गुलनास मुजावर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. एस. डी. रक्ताडे यांनी आभार मानले. उपस्थित आजी - माजी विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयाने स्नेहभोजन दिले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. संजय जाधव, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, ग्रंथपाल सूरज पवार , सेवक तानाजी मोहिते , संजय माने यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा