*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
*कोणीही असो शेवठी जीव महत्वाचा*
*एक स्त्री होती ती बाळंतपण होण्याच्या मार्गावर होती पण तिचा BP 190 असल्या कारणाने तिला अकलूज सरकारी दवाखान्यात ऍडमिट करून घेत नव्हते कारण त्या हॉस्पिटल मध्ये ICU ची सुविधा नव्हती त्यामुळे त्या मातेस सोलापूर ला घेऊन जाण्यास सांगितले आणी ते ही तात्काळ कारण त्या मातेस BP जास्त असल्या कारणाने झटके येण्याची शक्यता होती .मला माझ्या मित्राने ही सर्व परिस्थिती सांगितली. आणी तुम्हांलाच सोलापूर घेऊन जावे लागत आहे .मी 4 ते 5 दिवस मुंबई ला असल्या कारणाने कामे पेंडिंग होती .मनात एक विचार केला आपलेच नाते वाईक असते तर किंवा आपल्याच घरातील किंवा आपल्याच भावकीतील कोणी माता असते तर मी सर्व कामे सोडून तिला सोलापूर ला घेऊन गेलो असतो .भले ही माता आपली कोणी नाही परंतु एक जीव आहे आणी दुसरा जीव तिच्या पोटात आहे .हा विचार मना मध्ये आला आणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण डोळ्या समोर आली साहेबांनी एक मुस्लिम सामाज्यातील वेक्तीला मातोश्री मध्ये नमाज पडण्याच्या टाईमिंग ला मागचा पुढचा विचार न करता नमाज पाठण्यास सांगितले त्यांच्याच मि एक शिवसैनिक आहे आणी मागचा पुढचा न विचार करता त्या मातेस सोलापूर ला घेऊन गेलो व सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणी ती माता जो पर्यंत बाळंत होत नाही तोपर्यंत थांबलो .त्या मातेस मुलगी झाली ती मुलगी आणी ती माता एकदम सुखरूप आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा