Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

*मुंबईमध्ये HMVP चा शिरकाव- सहा महिन्याच्या चिमुकलीला झाली लागण-- रुग्णालयात उपचार चालू!*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकनंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत.


महाराष्ट्रात नागपूरनंतर आता मुंबईत रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झालीय. तिला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल केलं होतं. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. 


हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरनी बोलताना सांगितलं की, याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आलीय. 1 जानेवारीलाच या प्रकरणाची माहिती समजली होती. बीएमसीच्या परेलमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाने मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलंय. देशभरात १० पेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसात आढळले आहेत. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दोन रुग्ण आढळल्याची माहिती सोमवारी दिली होती.


चीनमध्ये एचएमपीव्ही रुग्णवाढीच्या दरामुळे जगाची चिंता वाढलीय. कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा धोका निर्माण झाल्यानं जगभरात खळभळ उडालीय. पण हा व्हायरस गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्यानं घाबरण्याची आवश्यकता नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. कोरोनासारखी स्थिती होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे.


आता नव्या रॅपिड चाचण्या उपलब्ध असून त्यामुळे काही तासाताच या व्हायरसची लागण झालीय की नाही ओळखता येते. यासाठी ७ हजार रुपयांचा खर्च असल्याचं एका डॉक्टरांनी म्हटलंय. एचएमपीव्हीच्या लक्षणापैकी एक असलेल्या तापाच्या प्रकरणांकडेही लक्ष दिलं जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील गाइडलाइन्समध्ये डॉक्टर आणि लॅबसाठी एचएमपीव्हीच्या प्रकरणांबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना कळवणं बंधनकारक केलेलं नाही. जर डॉक्टर आणि लॅबकडून आम्हाला माहिती दिली गेली तर आम्हाला फ्लू सारख्या आजारांच्या वाढीवर विशिष्ट भागामध्ये योग्य पद्धतीने लक्ष देता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा