*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
राज्यातील बुलढाणा, शेगांव येथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धूमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसांत चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून, कुटुंब ची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण परसले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगावच्या अनेक गावांत सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत. आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते, यामुळेच नागिरक घाबरले आहेत. विशेष म्हणजे शेगावजवळील अनेक गावांत हा व्हायरस पसला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेले आहेत, त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.
मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडूनही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे , त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिर राबवण्याचे आवाहन केले आहे. या गावामधे आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नव्हती.कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामधे केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहेत याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गीते यांना निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा