Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

*धाराशिव येथील वादग्रस्त ठरलेले जिल्हाधिकारी "सचिन ओंबासे "यांची सोलापूर येथे महानगरपालिका आयुक्त पदी बदली*

 


*सोलापूर---प्रतिनिधी*

*आंबिद. बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

धाराशिव – धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर येथे बदली झाली असून सोलापूर महानगरपालिका आयुक्त पदी त्यांची वर्णी लागली आहे.

जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी धाराशिव जिल्ह्यात काही महत्वाचे निर्णय घेतले होते तसेच तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या कामासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला असून आराखडा मंजूर होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आहे. दोन वर्षापूर्वी त्यांची जिल्हाधिकारी म्हणून

बोगस नॉन क्री मी लेअर प्रकरणात डॉ. सचिन ओम्बासे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार दाखल असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.

   तसेच धाराशिव (उस्मानाबाद)चे उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे यांचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी सुड बुद्धीने केलेल्या निलंबनामुळे ते वादग्रस्त ठरले होते शिवाय हे प्रकरण संभाजीनगर (औरंगाबाद) आयुक्तांच्या कार्यालया पर्यंत गेले होते संजय ढवळे यांना निलंबन करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना नसताना त्यांनी त्यांचे निलंबन केल्याने तो चर्चेचा विषय बनला होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा