Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

*सांगली जिल्ह्यातील -जत- मध्ये 4 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार करून तुकडे करून खून!..ही माणुसकीची हत्या! आरोपीला तात्काळ" फाशी' व्हावी..*


 

*इक्बाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार).* *सांगली*

 *मो:-8983587160*

 आज माणुसकीची हत्या झाली आहे, संवेदनांचा  खून झाला आहे आणि 

सदविवेकबुद्धीचा गळा घोटला गेला आहे. कारण सांगली जिल्ह्यातील जत येथील करजणी  या छोट्याश्या गावी 4 वर्षाच्या चिमुरडीचा अत्याचार करून,तिचे तुकडे. करून "खून" करण्यात आला आहे. 

वय वर्ष 4 असलेल्या मुलीला काय समज असणार ?? अंगणात खेळत असणाऱ्या  पांडुरंग या नराधमाने तिला "फूस" लावली. मुलीची आई गरोदर असल्याने प्रसूती साठी दुसऱ्या गावात गेली होती. घरात फक्त तिची आज्जी होती.नातं बाहेर खेळत असेल म्हणून ती आत कामं करत होती.परंतु बाहेर असणाऱ्या नराधम पांडुरंग याने "डाव" साधला. "आमिष" दाखवत एका पत्र्याच्या खोलीत नेऊन त्याने चिमुकलीवर  लैंगिक अत्याचार केला.आणि तिचा खून केला.

दारू पिलेला हा नराधम त्या चिमुकलीला लपवण्यासाठी तेथील एका लोखंडी पेटीचा आधार घेत तिचा मृतदेह त्या पेटीत टाकला.



दुसरीकडे नातं हरवली म्हणून आज्जी सर्वत्र मुलीचा शोध घेत होती.सर्वत्र शोधाशोध सुरु होती. पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.काही अंतरावर हा "क्रूरकर्मा" दारू पिऊन तर्रर्र होता.पोलिसांनी त्यांचा "खाक्या" दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

नातीचा मृतदेह पाहताच आज्जीने हंबरडा. फोडला. 4 वर्षीय मुलीची हत्या झाल्याचे कळताच संपूर्ण जत शहर सुन्न झाले. सर्वांची पायाखालची "वाळू"  जणू घसरली होती. दुर्दवी आज्जीचे रडणे आणि आक्रोश जत च्या माणुसकीच्या अभेद्य भिंती भेदत न्यायाची भीक मागत होत्या.

क्रूर पांडुरंग याला फाशीची शिक्षा होण्यासाठी,आता सांगली जिल्हा एकवटला असून "जत बंद" चे  नियोजन केले आहे.तसेच सांगली जिल्ह्यात देखील याचा "निषेध" करण्यात येत आहे.

4 वर्षीय चिमुकली परत येणार नाही.पण संवेदना हरवलेल्या या जगात प्राणाची किंमत "शून्य" आहे, याची जाणीव अंगाला "शहारे" आणणारी ठरत होती. या आरोपीला फाशी होण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टात केस चालवावी. 

पाश्चिमात्य देशात  बलात्कार / खून  प्रकरणात आरोपीला दोन दिवसात  तात्काळ "फाशीची" शिक्षा दिली जाते. जतमध्येही हिच अपेक्षा आहे ! 

हृदयद्रावक.  आणि क्रूर हत्येचा जाहीर निषेध ..जाहीर निषेध !!



*इकबाल  बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा