*नळदुर्ग.- -प्रतिनिधी*
*रहेमान --शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने याची का क्रमांक 4022/19 अमान याचिका 169/ 2023 दिनांक झिरो 04/02/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या आदेशाप्रमाणे परिच्छेद नं.13 व 14 च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी धाराशिव व सोलापूर यांच्या देखरेखी खाली उपअधीक्षक
भूमीअभिलेख तुळजापूर यांनी सादर केलेल्या संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे बांधित झालेले शेतकऱ्यांच्या मालकी हक् GBकाचे क्षेत्र भूसंपादन करून नवीन प्रचलित कायदा व नियमानुसार व्याजासह मोबदला (मावेजा) देण्यासाठी मा. संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांना शेतकऱ्यांचे मालकी हक्काचे बाधित क्षेत्र संपादनाची प्रक्रिया तातडीने करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करणे बाबत. धाराशिव जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे क
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी तुळजापूर तालुक्यातील मौजे नळदुर्ग, वागदरी गुजनूर, शहापूर निलेगाव गुळहळ्ळी या गाव शिवारातून रा.मा. क्र.652 हा रस्ता गेलेला असून या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीचे क्षेत्र बाधित होत असल्याने शेतकऱ्यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. मा. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे मा. जिल्हाधिकारी साहेब, धाराशिव व सोलापूर यांच्या देखरेखेखाली संयुक्त मोजणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मा. उपअधिक्षक भूमीअभिलेख तुळजापूर यांच्या भूमापकांनी रितसर जायमोक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता विभाग सोलापूर यांच्या प्रतिनिधीने दाखवलेल्या सिमांकनानुसार भूसंपादन संस्था प्रतिनिधी शेतकरी यांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून त्या मोजणी अहवालावरती उपअधिक्षक संबंधित अधिकारी यांच्यासह भूसंपादन संस्था कार्यकारी अभियंता रा.मा.वि.सोलापूर यांच्या प्रतिनिधीने केलेल्या स्वाक्षरीने संयुक्त मोजणी अहवाल मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला. त्याप्रमाणे मा. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत दिनांक 22/ 8/ 2024 रोजी न्यायालयात उपस्थित राहून दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी भूसंपादन संस्था कार्यकारी अभियंता राज्य मार्ग विभाग सोलापूर यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली असून त्याप्रमाणे दिनांक 01/01/ 2025 रोजी दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात राष्ट्रीय महामार्ग अधिनियमातील तरतुदीनुसार कलम 3A अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली या प्रसिद्ध पत्रकार 21 दिवसाच्या आज शेतकऱ्यांनी (अक्षेप )हरकतीघेण्याचे सांगितले त्याप्रमाणे बाधित क्षेत्र शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांच्याकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या भूसंपादन बाबीची दिनांक 06/ 09/ 2025 रोजीच्या गाईडलाईन सह (अक्षेप) हरकती नोंदविल्यानंतर जिल्हाधिकारी धाराशिव यांनी 10/02/2025 रोजी संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्यासह भूसंपादन संस्था कार्यकारी अभियंता राज्य मार्ग विभाग सोलापूर यांचे प्रतिनिधी बाधित क्षेत्र शेतकरी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठक घेतली या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी यांनी दिनांक 04/02/ 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपतीसंभाजी नगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आदेशाचे पालन करून परिच्छेद नं. तेरा व 14 चे तंतोतंतपालन करून राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांच्या वतीने दिनांक 01/01/2025 रोजी दिलेल्या दैनिक दिव्य मराठीतील प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग अधिनियम तरतुदीनुसार कलम 3A अधिसूचने तील सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घेतलेल्या लेखी आक्षेप हरकतीचा विचार करून पुढील भूसंपादनाची कार्यवाही करावी अशी मागणी केली परंतु जिल्हाधिकारी यांनी संयुक्त मोजणी करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांना सांगितले व मोजणीसाठी चे पैसे राज्य मार्ग विभाग सोलापूर यांनी भरण्यास सांगितले परंतु केवळ मोजणी करणे म्हणजे भूसंपादनातील हा वेळ काढताना असून न्यायालयाने अशा कोणत्याही प्रकरणी मोजणी करण्याचे किंवा न्यायालयात जिल्हाधिकारी धाराशिव किंवा राज्य मार्ग विभाग सोलापूर यांनी संयुक्त मोजणीची मागणी केली नाही किंवा तसा कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नसताना जाणीवपूर्वक हा मोजणीचा घाट घातला जात असून हा बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय च्या आव्हान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यांनी दैनिक दिव्य मराठीतील प्रसिद्ध झालेल्या कलम 3A ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आक्षेप हरकती बाबत पुढील कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपल्या स्तरावरून संतोष राऊत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव यांना आदेश निर्गमित करावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे
*सोबत*
1) मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठ याचिका क्रमांक 4022/19 ची प्रत
2) उपअधीक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करण्यात आलेल्या संयुक्त मोजणी अहवालाची प्रत
3 ) जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी न्यायालयात उपस्थित राहून सादर केलेल्या शपथ पत्राची प्रत
4) दैनिक दिव्य मराठी दिनांक 01/01/2025 रोजी प्रसिद्धी करण्यात आलेल्या राजपात्राची प्रत
5) शेतकऱ्यांनी घेतलेल्या अक्षेप फारकतीची प्रत
6) मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या दिनांक चार जून 04/02/2025 रोजीच्या निर्णया च्या आदेशाची प्रत
7) दिनांक 10/02/2025 रोजच्या जिल्हाधिकारी जागा शिव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीची नोटीसीची प्रत
8) आढावा बैठक इतिवृत्ताची प्रत
9) सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 06/ 09/ 2024 रोजीच्या भूसंपादनाबाबत लाईन्सची
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा