*नळदुर्ग.- -प्रतिनिधी*
*रहेमान --शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व तुळजापूर तालुक्यात अंमली पदार्थाची होत असलेली विक्री रोखण्यासाठी शासन स्तरावरून खास बाब म्हणून आपल्या स्तरावरून तातडीने उपायोजना करण्याचे संबंधिताना आदेश निर्गमित करण्यात येवून या संदर्भात शासन स्तरावर निर्णय व्हावा. अन्यथा दि. 13/05/2025 वार गुरूवार रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील संविधान चौकात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात होलीका दहन करून बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव त्यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाराशिव जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे कि धाराशिव जिल्हा हा आकांक्षित मागास ज्
दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून निसर्गाच्या आवकृपेने जिल्ह्यात 2025 साली धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके वाशी धाराशिव लोहारा शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आले तर उर्वरित तालुके दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आले यात तुळजापूर तालुक्यातील नव महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली यात तुळजापूर तालुक्यातील नऊ महिने मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून शासनाने सवलती लागू करून त्याचे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री घोषणा करून त्याची अंमलबजावणी केली नाही तुळजापूर तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कामगार शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांना या सवलतीचा उपयोग म्हणावा तसा झाला नाही त्यानंतर 2024 साली तुळजापूर तालुक्यातील महसूल मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे पिक वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाल्याने त्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला शासनाच्या जुन्या कशामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अपघात नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही सन 2020 ते 2021 चा पिक विमा न्यायप्रविष्ठ आहे 2022 ते 2023 चा उर्वरित पिक विमा थकीत आहे 2024 चा पिक विमा 25% अग्रीम रक्कम काही लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेली परंतु बरेच शेतकरी त्यापासून वंचित राहिले त्यातच केंद्र सरकारने 26 /04/2024 रोजी काढलेल्या परिपत्रकात मुळे शेतकऱ्यांना 75% पीक विमा ची रक्कम मिळू शकली नाही त्याचबरोबर अनेक साखर कारखाने 2025 च्या गणित हंगामात ऊस कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांवरती अन्याय तर केलाच परंतु गेल्या दोन वर्षांपासून व शेतकऱ्यांचे उसाचे बील आजपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेले नाही अशा कठीण आर्थिक परिस्थितीतून शेतकरी जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विविध शासकीय योजनेचे अनुदान अतिवृष्टी अनुदान दुष्काळ अनुदान व ऊस बिले थकीत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत धाराशिव जिल्ह्यात विशेषता तुळजापूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून मादक पदार्थाचा ओळखा (गांजा ड्रग्ज)पडला असून सद्यस्थितीत करून महाविद्यालयीन मुले बेरोजगारी मुळे व्यसनाच्या काचाट्यात अडकले जात आहेत बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तरुण शेतकरी मानसिकरित्या खचला जात असून तो सहज उपलब्ध होत असणाऱ्या मादक पदार्थाच्या सेवनाचा आधार घेत आहे तरी मुख्यमंत्री यांनी याबाबतीत पोलीस प्रशासनास धाराशिव जिल्ह्यात विशेषता तुळजापूर तालुक्यात मादक पदार्थाचा रिमोट करण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे अशी सर्व सामान्य जनतेची आपल्याकडून अपेक्षा आहे
तरी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच उर्वरित राहिले पीक विम्याची रक्कम शासकीय सतरावरील अनुदान उसाची थकित मिले देण्यासंबंधी आदेश तातडीने निर्गमित करावा अन्यथा गुरुवार आहे दिनांक 13 मार्च 2025 रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोजे नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील संविधान चौकात शासनाच्या शेतकरी विरोध धोरणाच्या विरोधात पलिका दहन करून करण्यात येणार आहे असा इशाराही निवेदनात दिला आहे
*सोबत*
१) दुष्काळ सदृश्य परिस्थिती शासन स्तरावरून लागू केलेल्या सवलतीची अंमलबजावणी करून केलेल्या उपाययोजनेची माहिती मागण्यासाठी केलेले आंदोलन व शासन स्तरावर केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत
२) दुष्काळ सदृश्य परिस्थितीत तुळजापूर तालुक्यात शासन स्तरावरून केलेल्या उपाययोजना व अंमलबजावणी ची शासन स्तरा वरून दिलेली कागदोपत्री माहिती प्रत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा