*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील चोरी, अवैध धंदे व नुकताच मिळून आलेल्या ड्रग या आमली पदार्थ मिळून आल्याने या अवैध धंदे वाल्यांचा समोर नायनाट करावा यासाठी तुळजापूर शहर वासीय व तुळजाभवानी भक्ताकडून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे कि
आम्ही तुळजापूर शहरातील नागरीक व श्री देवीभक्त निवेदन देत आहोत की, तुळजापूर शहरात गेली दोन वर्षापासून पोलीसांचा कसलाही धाक राहीलेला नसुन वेळोवेळी चोरी, लुट, दरोडे, फसवणूक, वेश्या व्यवसाय, आमली पदार्थ (ड्रग), जुगार अशा अवैध धंदयाना प्रचंड उत आला आहे. नागरीक व भक्त यामुळे अतिशय त्रस्त व भयभित झालेले आहेत.
वेळोवेळी तक्रारी व असे व्यवसाय करणारे लोकांची नावे निष्पन्न झाली असतानाही कांहीही कारवाई केली जात नाही, असे गुन्हे कमी होण्याऐवजी गुन्हयात प्रचंड वाढ होत असलेली दिसुन येत आहे. यामुळे गुन्हेगार आणि पोलीस यांचेच लागेबांधे आहेत हे निष्पन्न होते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या व देशभरातुन भाविक श्रध्देने तुळजापुरी येतात. त्यांना चोरीचा व अव्यवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे हे तिर्थक्षेत्र नावारुपास येण्या ऐवजी संपुर्ण महाराष्ट्रात अतिशय बदनाम होत आहे.
नुकतेच गेली 2/3 दिवसापुर्वी ड्रग्ज आमली पदार्थ शहरात येत असताना तामलवाडी पोलीसांनी कारवाई करुन ड्रग व आरोपी मुद्देमालासह पकडले आहेत. आजरोजी तुळजापूरात ड्रग विकणारे 20/25 तर यांचे अधीन 1500/2000 तरुण झालेले असुन त्यांचे भविष्य अंधारात आहे. वेळोवेळी डी.वाय.एस.पी. श्री. निलेश देशमुख तुळजापूर पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र खांडेकर यांना गुन्हेगाराची नावानिशी यादी ड्रग घेत असलेले व्हीडीओ देवूनही जाणीवपूर्वक सदरील अधिकाऱ्याकडुन दुर्लक्ष केले जात आहे. यांचाच अर्थ गुन्हेगार आणि सदरील दोन्ही अधिकाऱ्याचे आर्थिक हित संबंध दिसुन येतात. यामुळे शहरातील तरुणाचे भविष्ण अंधारात जात असून संपूर्ण शहर नशिली पदार्थाच्या अधीन झाल्याचे चित्र दिसून येत असून सापडलेल्या ड्रग्ज गुन्हेगार यांचे चौकशी होत असूनही ही चौकशी निपक्षपाती व सखोल व संपूर्ण ड्रग्ज व्यवसाय बंद करणे पोलीस यंत्रणे करून होऊ शकत नाही व यामुळे या व्यवसायाचे मूळ सूत्रधार हे बाजूला राहत असून जजबी कारवाई होत असून यामुळे शहरवासीयांना या पोलिस यंत्रणेवर काडी मात्र विश्वास राहिला नाही या गुन्ह्याची चौकशी व मूळ आरोपी शोधून काढण्यासाठी ही चौकशी शासनाच्या सक्षम यंत्रणेकडे सोपवून ड्रग व्यवसायिकांची पाळीमुळे खणून हा व्यवसाय संपूर्णपणे नष्ट व्हावा अशी मागणी शहरवासीयांची आहे
तुळजापूरचे डी वाय एस पी निलेश देशमुख पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांचे वरती शहरवासी यांचा विश्वास राहिलेला नसून त्यांच्याकडून नागरिक व भक्तांना न्याय मिळू शकत नाही अशा भ्रष्टाधिकाऱ्याची त्वरित बदली करावी अन्यथा येणाऱ्या काळात अशा अधिकाऱ्याच्या विरोधात शहरवासीयाकडून तीव्र आंदोलन केले जाईल तरी या निवेदनाची नोंद घेऊन तुळजापूर नागरिक व देवी भक्तांना याप्रकरणी न्याय मिळावा व शासनाचे होणारी बदनामी थांबवावी अशी ही विनंती निवेदनात केली आहे
*यासंदर्भात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत पोलीस प्रशासनाला झापून कान उघडणी केली आणि 72 तासात याचा लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला सोडू नका असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा