Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

अकलूज येथे शिवजयंती निमित्त-- मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने 'रक्तदान शिबिर'


 

अकलूज ----प्रतिनिधी

एहसान. मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलूज

मो:-9096 837 451

अकलूज मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६७ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे,संघाचे अध्यक्ष अँड. नितीन खराडे, उपाध्यक्ष विशाल गोरे, ज्येष्ठ संचालक डॉ. राजीव राणे, नवनाथ सावंत,डॉ. नितीन राणे,मनोज गायकवाड, नितीन देशमुख, डॉ. आनंद देशमुख, कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे आण्णासाहेब शिंदे, मयूर माने आदी उपस्थित होते.

      प्रत्येक रक्तदात्यांना ज्ञानदिप रक्त पेढीकडून प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवासह युवक आणि महिलांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरास किशोरसिंह माने पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश महाडिक, विठ्ठल गायकवाड, इंद्रजित नलवडे, जगदीश कदम, कुंडलिक गायकवाड, दिलीप माने, योगेश देशमुख, विक्रांत माने देशमुख,डॉ. सुरेश सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले.

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव प्रा. धनंजय देशमुख यांनी केले तर आभार ज्येष्ठ संचालक राम चव्हाण यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा