Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

शिवजन्मोत्सवाचा नरसिंहपूर परीसरात उत्साह; शिवगर्जनांनी दुमदुमला अवघा आसमंत


कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी 

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 8378081147

हलग्यांचा कडकडाट, तरुणांच्या सळसळत्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी जयजयकार व जल्लोषी वातावरणात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्त महाराजांच्या पुतळ्याचे पुजन व रात्री भारूड, सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुका काढण्यात आल्या. पायी आणलेल्या शिवज्योतींचे पुजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. 'जय भवानी, जय शिवाजी', 

'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आदि घोषणांच्या निनादात वातावरण शिवमय झाले होते. 



      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती नरसिंहपूर परीसर व पंचक्रोशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी टणू येथील जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अकलूज शिवसृष्टी किल्ला ते टणू शिवज्योतींच्या तसेच शिवप्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचे आय़ोजन करण्यात आले होते. जुगलबंदी भारूडातून समाजप्रबोधन सादरकरताना संदिप मोहिते (तिप्पेहाळी,सांगोला) व आण्णा चव्हाण (वायफळ,जत) यांचे झाले. यासाठी अबालवृद्ध, महिला, तरूण व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने भव्य रांगोळींच्या पायघड्या, भगव्या टोप्या, उपरणी घालुन दुचाकीला भगवा झेंडा लावून हलगी, लेझमाच्या तालावर नाचत गावांतर्गत भव्य दिव्य रॅली काढण्यात आली.



   नरसिंहपूर परीसरातील आडोबावस्ती, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, गणेशवाडी, शिंदेवस्ती परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने परीसरातील बाजारपेठ आकर्षक मंडप, विद्युत रोषनाईसह भगव्या पताकांनी सजली होती. सकाळ पासूनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.



    दरम्यान सायंकाळी गावांतर्गत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची आकर्षक सजविलेल्या ट्रॅक्टरमधून हलग्या, लेझमाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात भव्य मिरवणुक काढण्यात आल्या.  

फोटो-टणू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना कार्यकर्ते दिसत आहेत.

---------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा