*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणी फिर्याद देणाऱ्या व पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनाच आरोपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या पोलीस प्रशासना च्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी तुळजापूर नगरवासिय व पुजारी मंडळाच्या वतीने 21 फेब्रुवारी 25 रोजी तुळजापूर येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आणि तुळजापूरचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले त्या निवेदनात केलेली मागणी पुढील प्रमाणे
तुळजापूर शहर वाशीय खालील सह्या करणारे दि.20/02/2025 रोजी मा.ना.प्रतापजी सरनाईक पालकमंत्री धाराशिव. जिल्हा यांनी ड्रग्स संबंधी 72 तासात लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असताना, यांच वेळी तुळजापूर DYSP तुळजापूर यांनी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे यांना तुम्ही पालक मंत्र्यान समोर खोटी माहिती देत आहात. तुमच्या वरती कादेशीर कार्यवाही करावी लागेल. म्हणजे फिर्यादीलाच आरोपी केले जात असून वास्तवीक ड्रग्स प्रकरणी सखोल चौकशी, तपास होणे आवश्यक आहे
सदरील प्रकरणी तुळजापूर DYSP व P.I यांनी दोन्ही अधिकाऱ्यांकडून ड्रग्स प्रकरणी न्याय मिळणे शक्य नाही. अशी धारणा तुळजापूर करांची झालेली आहे.
ड्रग्स प्रकरणी सखोल निपक्ष:पाती पुणे चौकशी होऊन तीर्थ क्षेत्राची होणारी बदणामी रोकावी. व ड्रग्स ची सर्व पाळेमुळे खणुन काढावित व दोषी वरती नियमानुसार कार्यवाही व्हावी. अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
माहितीस्तव निवेदनाची प्रत
खालील मान्यवर अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे
1. मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.
2. मा. पोलीस अधिक्षक साहेब, पोलीस अधिक्षक कार्यालय, धाराशिव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा