Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

*तुळजापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कामासाठी समिती नवीन कामास मंजुरी देण्यात यावी-- श्याम पवार*

 




*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कामास असलेली स्थगिती उठवुन तसेच नविन कामास (शेतरस्ते, विहीरी, दोन गावाला जोडनारे रस्ते) मंजुरी देण्यात यावी अशी मागणी श्याम पवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख धाराशिव यांनी फलोत्पादन रोजगार हमी खार जमीन विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की तुळजापूर तालुका हा कुसळी व डोंगराळ भाग आहे. तसेच या तालुक्यातील कष्टकरी नागरीकांना कोणाताही औद्योगीक रोजगार किंवा व्यापारासाठी बाजापेठ उपलब्ध नाही. येथील नागरीक हे मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उर्दनिवाह करीत आहेत. तालुक्यातील अनेक नागरीक हे रोजगार हमी योजने अंतर्गत असलेल्या कामावर अवलंबुन आहेत. असे असताना गेली 2 ते 3 वर्षापासुन तुळजापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेची कामे बंद करुन त्यास स्थगिती आलेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 



 तरी आपण याबाबत विचार करुन तुळजापूर तालुक्तयातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामासाठी असलेली स्थगीती उठवुन तुळजापूर तालुक्यातील नविन रोजगार हमी योजनेच्या कामाना मंजुरी देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा