Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

*शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सवास प्रारंभ*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

 *केदार. लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात सृजनरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवाचे उद्घाटन युवानेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.हा महोत्सव १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

         यावेळी मार्गदर्शन करताना सयाजीराजे मोहिते-पाटील म्हणाले की,महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थींना अभ्यासाबरोबर खेळाचे देखीला ही महत्व दिले असल्यामुळे यातून उदयमुख खेळाडू निर्माण होतील.सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या विकासाचा चौफेर आढावा घेतला. 




        या सृजनरंग महोत्सवामध्ये महाविद्यालयातील आर्ट्स, कॉमर्स,सायन्स वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.आज सुरुवातीच्या दिवशी बॉक्स विकेट क्रिकेटच्या मॅचेस घेण्यात आल्या.या स्पर्धेचे समालोचन व्यावसाय अभ्यासक्रमाचे प्रा.जयंत माने यांनी केले.यानंतर या महोत्सवामध्ये मोबाईल फोटोग्राफी,मेहंदी स्पर्धा,निबंध स्पर्धा,लेखन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रोजेक्ट सादरीकरण स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धामधून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असल्याचे दिसून येत आहे.या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघासाठी महाविद्यालयातील शिक्षक संघ व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले असून या प्रत्येक स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी महाविद्यालय बाहेरील परीक्षक नेमण्यात आले आहेत.या स्पर्धा पाहण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत आहे.

         या स्पर्धा पार पडण्यासाठी सृजनरंग महोत्सवाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड तसेच सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा