Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५

हुपरी येथे संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.


 

हुपरी -- प्रतिनिधी

हर्षल. पोतदार 

हुपरी (ता.हातकणंगले) येथे श्री विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३९ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास हातकणंगलेचे आमदार प्रमुख पाहुणे अशोकराव माने हे उपस्थित होते.

             सकाळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.स्वाती व श्री.रवि पोतदार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सोनार समाज महिला भजनी मंडळाचा सुश्राव्य 

भजनाचा कार्यक्रम झाला व दुपारी बारा वाजता संत नरहरी महाराज यांची आरती होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमदार अशोकराव माने यांचा सत्कार किरण पोतदार यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत हर्षल पोतदार यांनी केले.



         यावेळी मार्गदर्शन करताना आ.माने म्हणाले की,प्रत्येक समाजात एकोपा असेल तर समाजाची प्रगती होत असते. आजच्या कार्यक्रमातून सोनार समाजाची एकी दिसून आली असून पांचाळ सोनार समाजाच्या प्रगतीसाठी सर्वस्वी सहकार्य व मदत करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले.या कार्यक्रमासाठी सोनार समाजातील सर्व जेष्ठ नागरिक, महिला भगिनी व सुवर्णकार युवक मंडळ हजर होते. महाप्रसादाने पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा