*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
दर्जेदार स्पॉन वापरून मशरूमचा भविष्यामध्ये फायदेशीर व्यवसाय करता येईल असे मत डॉ.टी.एस.रोडगे यांनी व्यक्त केले. शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागामार्फत मशरूम लागवड या संबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून अनगर येथील बाबुराव पाटील आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्रा.डॉ.टी.एस रोडगे हे होते.
त्यांनी या कार्यशाळेमध्ये मशरूमचे प्रकार आणि त्याची उपयुक्तता याविषयी माहिती देऊन मशरूम लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.तसेच या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.टिळेकर यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० मध्ये शासन कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम समाविष्ट करीत आहे तरी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कोर्सेस करून कौशल्य विकसित केली पाहीजे.असे मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एम सातपुते यांनी केले.
ही कार्यशाळेस शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील,सचिव अभिजीत रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे- पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.एम.धाईंजे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्रा.व्ही.एम.कुंभार यांनी मानले.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ.एस.एच.वाघ, प्रा.डी.एफ.देशमुख,ए.ए.साठे आणि प्रयोगशाळा परिचारक बी.बी.कदम यांचे सहकार्य लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा