अकलूज ----प्रतिनिधी
एहसान. मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलूज
मो:-9096 837 451
अकलूज .ता.माळशिरस येथील "ताहेरा फाउंडेशन "म्हटले की एक आशेची किरण.... निर्माण होते कारण ताहेरा फाउंडेशन ही अनेक सामाजिक व हिताचे उपक्रम राबवून समाजात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे मग तो कोरोना काळातील गोरगरिबांना अन्नधान्याची किट वाटप, गरीब होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप ,गरजू महिलांचा विमा करून त्यांना आधार देणे ,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ,आपल्या हालाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण देऊन उंच शिखरावर पोहोचवणाऱ्या पालकांसाठी "आदर्श पालक "म्हणून सन्मान करणे किंवा गरीब होत करू कुटुंबातील विद्यार्थी असेल त्याच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हातभार लावणे तसेच दरवर्षी उज्वल यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे एक ना अशा अनेक उपक्रम राबवून आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करणारी एकमेव संस्था म्हणजेच" ताहेरा फाउंडेशन"होय!...
ताहेरा फाउंडेशन चे कार्य केवळ समाजापुरतेच मर्यादित नसून त्यांनी आषाढी वारी मधील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांना मोफत छत्र्या वाटप करण्याचे स्तुत्य उपक्रम राबवला तो माळशिरस तालुक्याचे जाणता राजा 'जयसिंह मोहिते पाटील' यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमती विजया सुधाकर पंधे यांच्या हस्ते -छत्र्या -वाटप करण्यात आल्या होत्या
तालुक्यातील अग्रगण्य सामाजीक संघटना ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने अकलूज परिसरातील एम.पी.एस.सी परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी सन्मान करण्यात आला. साजिया रशीद तांबोळी असिस्टंट महसूल सहाय्यक व साजिदा अब्दुल रशीद मुल्ला. अन्न सुरक्षा अधिकारी यांचा सन्मान ताहेरा फाउंडेशनच्या वतीने संपन्न झाला.
विविध सामाजीक उपक्रमापैकी आदर्श पालक सन्मान सोहळ्यात रशीद तांबोळी यांचा आदर्श पालक म्हणून आनंदयात्री जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ताहेरा फाउंडेशनच्या वतीने सत्कार झाल्याची आठवण राशिदभाई यांनी आवर्जुन सांगितली .
ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी दोन्ही गुणवंतांचे कौतुक करताना, मुस्लिम समाजातील इतर विद्यार्थ्यांनी शिकण्याचे आवाहन केले. रत्नाईपार्क चे हाजी युसूफभाई तांबोळी यांनी रशीदभाई यांनी प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिल्याबदल अभिनंदन केले. साजिया तांबोळी यांचा सन्मान शफिया तांबोळी यांच्या हस्ते झाला, तर साजिदा मुल्ला यांचा सन्मान रेश्मा तांबोळी यांच्या हस्ते झाला.
या सत्कार समारंभासाठी ताहेरा फाउंडेशनचे खजिनदार हाजी असलमभाई तांबोळी हाजी रशिद मुल्ला, रशिदभाई तांबोळी, सरफराज तांबोळी, इन्नूस तांबोळीसर, "टाइम्स 45 न्युज मराठी" चे संपादक--- हुसेन मुलाणी,शकील मुलाणी व इलाही बागवान उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा