Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

*विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा अविष्कार घडविणारे शेरी नं १ शाळेचे स्नेहसंमेलन कौतुकास्पद-- धनंजय देशमुख*


 

 *अकलूज --प्रतिनिधी*

 *केदार. लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

 वर्गाच्या चार भिंतीतील अध्यापना इतका शिक्षणाचा अर्थ संकुचित नाही तर मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा विकास घडविणे हा शिक्षणाचा गाभा आहे.त्या दृष्टीने शेरी नं १ शाळेचे स्नेहसंमेलन कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माळशिरस तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी काढले. 

          जिल्हा परिषद प्राथमिक शेरी नं १ शाळेच्या आविष्कार २०२५ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे शाळेचे माजी उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत गाटे गुरुजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डॉ.प्रेमनाथ रामदासी यांनी केले.आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी शाळेच्या प्रगतीचा चौफेर आढावा घेतला व भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला.  



            यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारी अप्रतिम अशी गीते सदर केली.एकदन्ताय या गणेश गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला.शिवकन्या या गीताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.स्त्री जीवनाचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या जन्म बाईचा या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले,गेला माझा सख्खा बॉयफ्रेंड या विनोदी गीताने सर्वाना पोट धरून हसण्यास भाग पडले,गमतीदार उखाण्यांना महिलांनी मनमुराद दाद दिली. चित्र अपुरे या बालनाट्याने वृद्धांच्या समस्येवर प्रकाश टाकला.सुमारे चार तास चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित ग्रामस्थ अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.   



         या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वोत्कृष्ठ नृत्य करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.चि.खालिक शेख,चि.ज्ञानेश्वर खुडे,चि.देवांश वाघ,कु.स्वरांजली माने-देशमुख, कु.अस्मिता थोरात,कु.अस्मिता खुडे यांना सर्वोत्कृष्ठ नृत्याचा पुरस्कार मिळाला.उपस्थितांनी भरभरून बक्षिसांची खैरात केल्याने या कार्यक्रमासाठी विक्रमी ६१००० रुपयांची लोकवर्गणी जमा झाली.यावेळी संभाजीभाऊ माने-देशमुख, भिमराव माने-देशमुख, बाळासाहेब माने-देशमुख,डॉ. उदयसिंह मानेदेशमुख,रमेश नाईक,डॉ.सोमनाथ माने- देशमुख,कल्याणराव माने- देशमुख,शहाजी शिर्के,धैर्यशील देसाई (पुणे) येथील कर्तव्य फौंडेशनचे डॉ.फैज सय्यद,सुधीर माने-देशमुख,सचिन पवार, कमलाकर माने-देशमुख, हिम्मतराव माने-देशमुख,रेहाना शेख,रणजीत माने-देशमुख, धैर्यशील माने-देशमुख,संदीप माने-देशमुख,जयसिंगराव माने-देशमुख,विजय आडत, मिलिंद माने-देशमुख,अमोल माने-देशमुख,रोहित माने- देशमुख,विराज घार्गे,गणेश पताळे,शितल खुडे,सुलोचना पवार,नाना खाडे,दत्तात्रय केंगार, संतोष थोरात,प्रियांका साठे, अशोक साठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पांडुरंग वाघ सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेश्मा खान व प्रदीप कोरेकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा