Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

*नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग ६५२ मधील बाधित जमिनीच्या संयुक्त मोजणी बाबत धाराशिव येथे १० फेब्रुवारी रोजी आढावा बैठक*


 

*नळदुर्ग ----प्रतिनिधी*

  *रहेमान. शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

 नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ मधील बाधित जमिनीच्या संयुक्त मोजणीबाबत मा. मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे दाखल याचिका क्र.४०२२/२०१९ संदर्भअवमान याचिका क्र.१५९/२०२३ च्या अनुषंगाने दिनांक १०/०२/२०२५ रोजी दुपारी १२.०० आढावा बैठक आयोजित केली असून

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव 



कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर 

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव 

तहसीलदार तुळजापूर 

उपाधीक्षक भूमी अभिलेख तुळजापूर जि. धाराशिव

दिलीप जोशी प्रतिनिधी शेतकरी संघर्ष समिती राहणार शहापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव

सरदार सिंग ठाकूर व समस्त शेतकरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट रा. शहापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव 

यांना ( संतोष राऊत) उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय जिल्हाधिकारी धाराशिव यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे की,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ मधील बाधित जमिनीच्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १०/०२/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशीव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी आपण सदरील वरील सर्व प्रशासकीय अधिकारी व बाधित शेतकरी यांनी बैठकीस अद्यावत माहितीसह वेळेवर स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहावे. प्रतिनिधी पाठवू नये

अशी सूचना पत्राद्वारे दिली आहे 



याची एक प्रत :- अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सक़ल आर्सेनल प्लॉट कंपाऊंड, हॉटेल सागर प्लाझा, कॅम्प पुणे यांना देवून कळविण्यात येते की, आपल अधिनस्त श्री. स.नि. शेळके, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ विभाग सोलापूर यांना बैठकीसाठी स्वतः उपस्थित राहणेबाबत आपलेस्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. असेही पत्रात म्हटले आहे

 उपजिल्हाधिकारी (भूसंपादन-समन्वय) जिल्हाधिकारी धाराशीव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा