*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित " राष्ट्रवादी चषक २०२५ " या क्रिकेट स्पर्धेचा समारोप महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास मंत्री आदरणीय श्री दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या उपस्थितीत झाला. ही स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी पासून तब्बल ५ दिवस चालू होती.३२ संघ, ३५० खेळाडूंचा सहभाग, भव्य दिव्य मैदान, वैद्यकीय सेवा, भरघोस रोख बक्षिसे, युट्यूब लाईव्ह, उत्कृष्ट नियोजन या वैशिष्ट्यांसह ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
यावेळी प्रथम बक्षीस ७७,७७७ व ट्राॅफी हे यंगर्स एलेव्हन बारामती यांनी, द्वितीय बक्षीस ५५,५५५ व ट्राॅफी हे नवनाथ धांडोरे इलेव्हन वालचंदनगर संघाने, तृतीय बक्षीस ३३,३३३ व ट्राॅफी नातेपुते संघाने तर चतुर्थ बक्षीस २२,२२२ व ट्राॅफी हे पिनु झेंडे इलेव्हन वालचंदनगर या संघाने जिंकले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट तथा क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशीकांत तरंगे, राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते प्रतापआबा पाटील, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, नेचर डिलाईट डेअरी चे कार्यकारी संचालक डॉ.ज्योतीराम देसाई, राष्ट्रवादी चे युवा नेतृत्व तथा उद्योगपती विनोद गांधी,देसाई हॉस्पिटल चे एम.डी. डॉ.बाबासाहेब कांबळे, साद फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे,कळंब चे प्रथम नागरिक अतुल सावंत,प्रा.अशोक वाघमोडे सर ,लासुर्णे चे ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा)लोंढे, प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रथमेश कदम, डॉ. मारूती हिंगणे पाटील, लासुर्णे चे सामाजिक कार्यकर्ते महेश लोंढे, राष्ट्रवादी चे शेखर काटे, बाबा गायकवाड,वालचंदनगर चे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना झेंडे, इंदापूर तालुका युवा सेनेचे मिलिंद साबळे, महेश रूपनवर, हे उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून किरण मिसाळ, युनुस पठाण, डॅनी कांबळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, छत्रपती चे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, लासुर्णे चे सरपंच सागर पाटील, डॉ. तन्मय पहलानी, सुजल विनोद गांधी व अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले होते.
हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस क्षितीजदादा वनसाळे, संतोष तोरणे, मिथुन खरात, बी एम कांबळे सर, सदाशिव सुर्यंगंध सर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा