*अकलूज ----प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलूज*
*मो:-9096 837 451
मंगरुळ : - राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धा नुकत्याच कोल्हापूर येथे संपन्न झाल्या असून यास्पर्धेत आशिष साठे यांच्या श्री कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना ब्रेन मास्टर प्रोऍक्टिव्ह पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आल्याने त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार निवारण मंचचे सदस्य उमाकांत मिटकर सर यांनी रविवार २३ फेब्रुवारी रोजी भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन आशिष साठे यांचे अभिनंदन केले
साठे यांचा विद्यार्थी आर्यन शिंदे हा देशातून प्रथम तर याच स्पर्धेत जुबेर शेख,श्रुती डोंगरे, अदनान मकानदार, इंद्रायणी हुककीरे, ह्दया जगताप, ईश्वरी चौधरी, समेरा मकानदार, रुद्र. जांभळे या विद्यार्थ्यांनी याच स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून . देशातुन बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट कामगिरी ) मिळवली .
या दहा विद्यार्थ्यांनी देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने उमाकांत मिटकर सर यांनी श्री कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्याचे आशिष साठे यांचे अभिनंदन व कौतुक केले
आशिष साठे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून गोरगरीब विद्यार्थ्यांची माफक दरात शिकवणी घेऊन आदर्शवत विद्यार्थी घडवत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी बोलावून त्यांचा विविध भेट वस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात येत असल्याचे ऐकून ही सदिच्छा भेट दिल्याचे मिटकर सर यांनी यावेळी अधोरेखित केले
श्री कोचिंग क्लासेसच्या वतीने उमाकांत मिटकर सर यांचा शाल , श्रीफळ , पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंगरुळ येथील ज्येष्ठ शिक्षक जब्बार शेख , डॉ एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव शेकुंबर शेख यांच्या विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा