Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

*अण्णा हजारे ,यांची धनंजय मुंडे सह कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

गेल्या काही दिवसांपासून बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात असलेला निकटवर्तीयाचा सहभाग आणि कृषी खात्यातील घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली. आता या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सक्रिय झाले असून त्यांनी आरोप होणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केली आहे. यामध्ये बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 


नुकतीच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जुन्या प्रकरणावरून नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजाराचा दंड ठोठावला आहे. यावर अण्णा हजारे यांनी आरोप होणाऱ्या या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी सर्वात प्रथम राजीनामा दिला पाहिजे त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा ही चांगली होते, कारण जनता हे आपलं बघून अनुकरण करत असते. मंत्रिमंडळात घेताना कोणाला घेऊन नये हे सुद्धा ठरवलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.


याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यमंत्री मंडळात घेण्याआधी अशा मंडळींचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्याचे आणि समाजाच देखील नुकसान होतं. मंत्र्यांचा आचार विचार शुद्ध असले पाहिजे. सुरुवातीच चुकलं की नंतर अशा घटना कायम घडतात, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा