*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर शहरालगत धाराशिव छत्रपती संभाजीनगर (हायवे लगत असणारे स.न. 138/1 या ठिकाणी यात्रा मैदानासाठी दि. 28/02/1998 या तारखेला 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन भुसंपादन झालेली आहे. त्या भुसंपादीत शासनाच्या जागेवर बळजबरीने कपटनितीने व संगणमताने बोगस लेआऊट क्षेत्रात इ गालेले बोगस लेआऊट रदद करुन कायदेशीर काग्रवाही करुन त्या ठिकाणी भाविकासाठी यात्रा मैदान होणे बाबत सार्वजनिक पुजारी बांधव तुळजापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे की
तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्ण शक्तीपीठ आहे. त्या ठिकाणी स.न. 138/1 याक्षेत्रावर तुळजापूर येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शासनाने 28/08/1998 या तारखेला हे भुसंपादन केलेले असताना या क्षेत्रावर तुळजापूर नगरपरिषदेच्या मा. नगरसेवकांने (मा. उपाध्यक्ष) यांनी नगर सेवक पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर संगणमताने लेआऊट तयार करून ती जमीन विक्री करुन गिळंकृत केलेली आहे. ज्या उददेशाने हे मुसंपादन झालेले आहे. तो शासनाचा उददेश सफल होताना दिसून येत नाही.
तसेच तुळजापूर शहरातील पुजारी बांधवाच्या जिव्हाळयाचा व भावनेचा प्रश्न आहे. भाविक भक्तांना या ठिकाणी सोईचे होईल व जवळच 500 मी अंतरावर देवीजीचे मंदिर आहे. तरी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की ज्या यात्रा मैदानासाठी नगरपरिषद तुळजापूर यांनी जागा आरक्षण ठेवली होती त्या यात्रा मैदानासाठी शासनाने ती जमीन भूसंपादन करून दिलेली आहे त्या ठिकाणी यात्रा मैदान निर्माण करून भाविक भक्ताची सोय व्हावी व तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे व त्या ठिकाणी यात्रा मैदान होणे हे अत्यंत गरजेचे आहे तुळजापूर शहरात वरचेवर भाविक भक्तांच्या होणाऱ्या संख्येत वाढ लक्षात घेता व पुढे भविष्यात ही वाढ अनेक पटीने होत राहणार आहे तरी याचा विचार करून शासनाने यात्रा मैदान निर्माण करून शहराच्या विकासात मानाचा तुरा रोवून भाविक भक्तांचे होणारी हेळसांड दूर करून त्या ठिकाणी यात्रा मैदान निर्माण करून तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांना व भाविक भक्तांना न्याय द्यावा अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच तुळजापूर शहर हे रेल्वे नकाशावर आलेले आहे तीर्थक्षेत्र असल्याने तुळजापूर शहरातील येणारे भाविका रेल्वेने सुद्धा येऊ शकतो रेल्वेमुळे लोक भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे
माहितीस्तव या निवेदनाच्या प्रति खालील विभागांना पाठवण्यात आले आहे
१)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य
२)नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
३)विभागीय आयुक्त औरंगाबाद
४) तहसीलदार तुळजापूर
५)मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा