Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

*सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील या पोलीस कॉन्स्टेबलने केली गळफास घेऊन आत्महत्या?......*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश ज्योतीराम पाडुळे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या तरुण पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलत आयुष्याचा शेवट केल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश पाडुळे यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती. 


प्राथमिक माहितीनुसार, महेश पाडुळे यांनी वैराग येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ड्युटी संपवून घरी आल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समजत आहे. ते मुळचे माढा तालुक्यातील अंजनगावचे रहिवासी होते. ते सोलापूर ग्रामीण मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती. त्यामुळे ते कुटुंबीयांसोबत वैराग येथे राहायला गेले होते. मात्र, त्यांनी गळफास घेऊन अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून त्यांच्या आत्महत्येचा कारणाचा तपास केला जात आहे. 


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी महेश पाडुळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली? ते तणावात होते का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेचा अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत. बुधवारी महेश पाडुळे ड्युटीवरून घरी आले. घरी पोहचताच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना वैराग येथील वैराग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ६ वर्षांचा मुलगा, एक आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलिस करत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा