Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

*सांगली जिल्ह्यात बीडची पुनरावृत्ती होत आहे का?* *सांगलीला बीड होऊ देणार नाही!..*



*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *(पत्रकार) ---सांगली*

  *मो:--8983 587 160

हळद व्यवसायाची "जननी" असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर "दर्जेदार" नावं असणाऱ्या हळदी ची बाजारपेठ म्हणून नावलौकिक असणाऱ्या सांगलीची वाटचाल आज "बीड" च्या दिशेने होतं चालली आहे का ??? बीड मध्ये वर्षात 105 "हत्या" झाल्या.त्यातील केवळ 5 प्रकरणात "गुन्हा" नोंद झाला आहे.

सांगली जिल्ह्यात बीड ची "पुनरावृत्ती" होतं आहे का ?? कारण दिवसा ढवळ्या सांगलीत मर्डर होतं आहेत. "नशाखोरी" वाढली आहे,मटका सर्रास सुरु आहे. चोऱ्या- दरोडे यांचे प्रमाण वाढले आहे.

आज सांगलीत गांजा / "मॅफेटरमाईनचे " घातक इंजेक्शन सर्वसामान्यांच्या "इच्छा - आकांक्षा" चा "सर्वनाश" करत आहे, पालकांच्या अपेक्षेवर "पाणी" सोडत आहे. दुर्दैवाने "निशब्द" पालक डोळ्यासमोर आपल्या मुलाची अधोगती पाहत आहेत. हे कधीतरी थांबायला हवं ..कोणीतरी हे रोखायला हवं..अन्यथा काळ आपल्याला कधीच "माफ" करणार नाही ! 


 *माझ्या पत्रकारितेने गांजा वर "अंकुश" !*


70 रुपयाचा "गांजा" गेल्या वर्षी मी लिहिलेल्या 5 लेखांमुळे आणि पोलिसानी

 केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे आज 200 रुपये झाला आहे. आता " बेकायदेशीर व्यावसायिकांनी" पुन्हा एकदा "डोके" वर काढल्याने अवैध व्यवसाय - मटका - गांजा आणि मॅफेटरमाईन इंजेक्शन अन्य समाजविघातक व्यवसायाविरुद्ध "लढा" देण्याची "वेळ" आलेली आहे असे वाटते. आता यापुढे मटका आणि गांजा हा अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी आणि "हजारो कुटुंब" वाचवण्यासाठी यापुढे "धारदार" आणि सडेतोड लेख लिहून अवैध व्यवसाय "कायमस्वरूपी" बंद होण्यासाठी सातत्याने माझे प्रयत्न राहतील.

 *मटका साम्राज्य आणि करोडोपती मालक*!




गरिबांच्या घरादाराची "राखरांगोळी" करत, सुखी संसाराची माती करत मटका खेळणाऱ्या किती लोकांच्या आयुष्यात "सुख" आले आहे ??? महाराष्ट्रात - सांगली जिल्ह्यात, सांगली - मिरजेत मटका मालक हें करोडपती आणि मटका लावणारे कंगाल अशी परिस्थिती आहे. या मटक्याचा "पोशिंदा" कोण ??? कोणाच्या "पाठबळावर" मटका विस्तारला आहे ???

मटक्याला कोणाचा आशीर्वाद आहेत ???

पोलिसांना मटका आणि त्यांचे "बगलबच्चे" माहित आहेत का ??? मटक्यामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या व्यथा"? कोण जाणणार ?? विस्कटलेल्या "संसारवेलीला" उभारी कोण देणार ?? भविष्यात मटक्याचा मुळाशी जाऊन,अनेक यशस्वी प्रकरणांप्रमाणे कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांना योग्य ते "पुरावे" देऊन मटक्याचे "उच्चाटन" होण्यासाठी भविष्यात माझा "पाठपुरावा" राहील.


 *बेधुंद नशेखोर तरुणाईचे संकट !*

 सांगलीचे आराध्यदैवत श्री.गणपती मंदिर आणि मिरजेतील ख्वाजा शमना मीरा दर्गाह साठी सुप्रसिद्ध असणाऱ्या सांगली जिल्ह्यात आज अवैध व्यवसाय - मटका - आणि गांजा यांनी शिरकाव केला असून सहज सुंदर - निकोप - सुस्वभावी सांगली जिल्हा "विद्रुप" झाला आहे.

18 वर्षाच्या मुलांकडे घातक इंजेक्शन कुठून येते ??? सांगली जिल्ह्यात गांजाचे थैमान माजले असून सांगली व विशेषतः मिरज मध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालकमंत्री *

श्री.चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने नशेखोरी विरुद्ध पोलीस "ऍक्शन मोड" वर आहेत. त्याशिवाय सांगलीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री.संदीप घुगे यांनी देखील कौतुकास्पद कामगिरी करत "लक्ष्य" वेधले आहे.

पोलिसांनी नशेचे इंजेक्शन आणि गांजा आणि मटका सम्राटांचे साम्राज्य" उध्वस्त करणे आवश्यक आहे. आज सहज उपलब्ध होणारी "नशा" भविष्यातील फार मोठे संकट असणार आहे .पोलिसानी अवैध व्यवसाय - मटका आणि गांजा वितरकांनी साखळी तातडीने मोडून काढणे ही काळाची गरज आहे. 

 सांगलीचा बीड आम्ही सांगलीकर कदापि करू देणार नाही हें मात्र निश्चित ! 


.*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा