*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- ----- राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
भगवानराव रामचंद्र गोरे यांचे पार्थिव बोराटवाडी (ता.माण, जि. सातारा) येथील निवासस्थानी अंतिम दर्शन आज सकाळी ११:०० ते ४:०० वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यविधी बोराटवाडी ता. माण जिल्हा सातारा येथे दुपारी ४ वाजता करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, माझे मंत्रिमंडळातील सहकारी जयकुमार गोरे यांचे वडील, भगवानराव रामचंद्र गोरेजी यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून दुःख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण गोरे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार ॲड राहुल कुल, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफानभाई शेख आदिंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा