Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

*कॉलेजमध्ये हिजाब बंदी करण्यास न्यायालयाचा नकार, कपडे परिधानाचा महिलांचा अधिकार, शिक्षण सर्वोच्च स्थानी* *सर्वोच्च न्यायालयाने फटकारले...*


 

 *इक्बाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार).* *सांगली*

 *मो:-8983587160*

 समाजात वावरताना जेथे नजरेने "बलात्कार" होतो, जेथे नराधमाकडून 5 वर्षाच्या मुलींवर बलात्कार. केला जातो, जेथे पाशवी सैतानी वृत्तीच्या लोकांपासून लहान मुली - तरुणी - महिला असुरक्षित आहेत आणि ज्या 21 व्या शतकात अंगप्रदर्शन आणि अश्लील वर्तनला तथाकथित "लोकमान्यता" मिळत असेल, "घाणेरडे व्हिडिओ" टी.व्ही. मोबाईल मध्ये आवडीने पाहिले जातं असेल , तेथे संपूर्ण "अंग" झाकणारे हिजाब आणि बुरखा एखाद्या अंगरक्षकाचे कामं करतात , महिलांना सुरक्षित राखण्याचे कामं करतात, महिलांची अब्रू राखण्याचे कामं करतात ,स्त्रीचे पावित्र्य जपण्याचे कामं करतात. 

हिजाब हें वाळवंटातील "ओएसिस" चे ..अर्थात "थंड झऱ्याचे" चे कामं करतात.

जर हिजाब मुळे महिलेच्या अंगाचे संरक्षण होतं असेल,"पाशवी" नजरेपासून बचाव होतं असेल आणि सामाजिक बांधिलकीचे कामं होतं असेल तर हिजाब चे सर्वार्थाने स्वागत व्हायला हवे.



मुस्लिम नसणाऱ्या माझ्या कित्येक आई - बहिणी तोंडाला स्कार्फ लावतात. वास्तविक स्कार्फ म्हणजेच एकप्रकारे हिजाबच आहे. कारण ऊन - धूळ - वारा आणि त्वचा जळणे अशा कारणांकरिता स्कार्फ अर्थात हिजाब उपयोगी पडते. जर स्कार्फ ही हिजाब ची "दुसरी आवृत्ती" असेल तर जातीयवादी आणि केवळ मुस्लिम विरोध म्हणून हिजाब ला विरोध करणारे भविष्यात स्कार्फला पण विरोध करणार का ?? आणि समस्त माता -भगिनीं त्यांचे ऐकतील असे वाटते का ???

हिजाब - बुरखा घातलेली युवती रस्त्यावर जातं असेल तर त्यांना एक सन्मानाच्या. नजरेने पाहिले जाते. सहसा त्यांची "छेड" कोणी काढत नाही. त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न होतं नाही.याचाच अर्थ हिजाब हें एक "चिलखत" आहे. 


कॉलेज मध्ये हिजाब नको यासाठी हिजाब साठी काही शक्ती "न्यायालयात" गेल्या होत्या. परंतु न्यायाधीशांनी कडक ताशोरे ओढत हिजाबच्या बाजूने निकाल दिला. कॉलेज मध्ये एखादी युवती बिंदी अथवा टिळा लावत असेल तर त्यांना पण कॉलेज प्रशासन रोखणार का ?? इतकी वर्ष तुम्हाला हा "नियम" करावासा वाटला नाही मग आताच त्यांचा "धर्म" तुम्हाला का दिसला ?? हिजाबने धर्म कोणता हें कळते मग त्यांच्या "नावाने" धर्म कळत नाही का ?? असे याचिकाकर्त्यांना न्यायाधीशांनी सुनावले. आज शिक्षण महत्वाचे आहे.त्यामुळे हिजाबबद्दल चर्चा होऊच शकत नसल्याचे त्यांनी जाहीर केले. हिजाब साठी आणि इस्लाम साठी आणि समस्त मानवजातीसाठी प्रेषित मोहंमद पैगंबर यांचे आदर्श विचार - आचार हें उपयोगी आणि हिताचे आहेत हें वारंवार सिद्ध होतं आहे. हिजाब आणि बुरखा हें त्याचे "ज्वलंत उदाहरण" आहे.


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा