*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त निरंकारी जगतात आजच्या दिवशी देशामध्ये "स्वच्छ जल, स्वच्छ मन" नावाने नदी व घाट परिसर स्वच्छ केला जातो. नरसिंगपूर येथील निरा व भिमा नद्यांचा संगम, घाट व नदीपात्र परिसर संत निरंकारी मंडाळाच्या सेवादल आणि साध संगतने स्वच्छ व चकाचक केला.
सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा वाढदिवस निरंकारी जगतात संपूर्ण भारत देशामध्ये "स्वच्छ जल, स्वच्छ मन" नावाने नदी परिसर व घाट परिसर स्वच्छ केला जातो. सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने सातारा झोनचे झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरसिंहपूर येथील निरा व भिमा नदीचा घाटपरिसर व दोन्ही नद्यांच्या संगमावर व नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
विविध प्रकारचे विधी करणेसाठी आलेल्या भाविकांकडून विधी साहीत्य, वापरलेली कपडे, गवत, काटेरी झाडे व इतर कचरा एकत्र करून संत निरंकारी मंडाळाच्या सेवादल व साध संगतने स्वच्छ केला. सदर स्वच्छता अभियानासाठी संत निरंकारी मंडळाचे ज्ञानप्रचारक आणि इंदापूर तालुका सेक्टर संयोजक महादेव शिंदे यांच्या उपस्थित सदरचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमास नरसिंहपूर ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, शिवाजी अवचर, सोनाली काळे, अनिल पवार, पोलीस पाटील अभय वांकर, ग्रामसेवक श्री. वाघमोडे, तसेच लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वच्छता अभियान यशस्वी करणेकामी नरसिंहपूर ब्रँचचे मुखी प्रकाश काळे व दत्तात्रय कोळी, महेश भोसले व सर्व सेवादल आणि साध संगतने विशेष परिश्रम घेतले.
फोटो - नरसिंहपूर येथील निरा व भिमा नदीचा घाटपरिसर व संगमावर संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा