*टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलुज*
*मो :9096837451*
मार्डी ता. लोहारा जि.(उस्मानाबाद) धाराशिव येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती (समरकंदी )उर्फ जिंदावली यांचा ६९९ वा उर्स (यात्रा ) सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असल्याचे दर्गाहचे विश्वस्त शेख सादिक अब्दुल हमीद यांनी पत्राद्वारे तहसीलदार लोहारा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव यांना कळवले असून त्याबाबत यात्रेस येणाऱ्या भाविकांना दिनांक ४,५,६ फेब्रुवारी २०२५ सुविधा पुरविणे बाबत ची मागणी केली आहे
, मार्डी येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती उर्फ जिंदावली दर्गा यांचा उर्स (यात्रा) सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हणजेच दिनांक ०४/०२/२०२५ वार मंगळवार रोजी संदल व दिनांक ०५/०२/२०२५ वार बुधवार रोजी चिरागा (दिवे) व कव्वाली चा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक ०६/०२/२०२५ रोजी जियारत म्हणजेच कुराण पठण करून प्रसाद वाटप केला जातो. व सायंकाळी सुमारे ०४ च्या दरम्यान नवसाची लहान मुलं न्योछावर केली जातात.
या उर्सला पर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या भाविकांना सुविधा पुरविणे म्हणजेच लाईट, पाणी, फिरते शौचालय, पाण्यासाठी टँकरची सोय उपलब्ध करून द्यावे, तसेच यात्रा काळात पिण्याच्या पाण्यासाठी श्री फेज लाईट २४ तास उपलब्ध करणे इत्यादी सुवेधेसाठी संबंधित खात्याला आदेशित करून यात्रेकरूंची सोय करावी अशी विनंती पत्राद्वारे केली आहे
विशेष म्हणजे या दर्ग्यावर जो संदल चढावला जातो तो संदल लोहारा येथून तहसीलदार यांच्या मानाचा असतो आणि तो संदल तहसीलदार स्वतः डोक्यावर घेऊन येतात आणि त्यांच्या उपस्थितीत संदल चा कार्यक्रम संपन्न होतो
तसेच दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी दर्गा परिसरात कव्वालीचा प्रोग्राम होणार आहे यामध्ये विविध ठिकाणचे कव्वाल सहभागी होत असतात
*चौकट*
*विशेष म्हणजे योगायोग असा आला आहे की दिनांक ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी पर्यंत मार्डी ता. लोहारा येथे "हरिनाम पारायण सप्ताह "चालू असून त्या सप्ताहची सांगता ही ६ फेब्रुवारी रोजी होणार असून हे एक हिंदू मुस्लिम साठी योगायोग आणि एकात्मिकते चे प्रतीक म्हणावे लागेल त्यामुळे क्वचितच असा योग पहावयास मिळतो*
माहितीस्तव प्रत खालील मान्यवरांना पाठवण्यात आले आहे
१. . जिल्हाधिकारी उस्मानाबाद (धाराशिव)
२. जिल्हा पोलीस प्रमुख उस्मानाबाद (धाराशिव)
३. वक्फ अधिकारी उस्मानाबाद (धाराशिव)
४. पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन लोहारा
५. बी डी ओ लोहारा
६. वैद्यकीय अधिकारी लोहारा
७. . सरपंच व ग्रामसेवक मार्डी





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा